पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/57

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५५)

नाही, असे इंग्लंदांतील मजूर व त्यांच्या बायका नेहमीं म्हणतात; परंतु ही त्यांची मोठी चूक आहे हिंदुस्थान इंग्लिशांच्या ताब्यांत राहणे, ही गोष्ट इंग्लंदांतील कोणत्याहि स्थितींतील मंडळीला जितकी महत्त्वाची आहे, तितकीच ती मजुरांनाहि आहे; व हें पुढील एकंदर हकीगतीवरून स्पष्ट होईल. तसेंच ह्या देशाशीं इंग्लिशांचा जो संबंध आहे, त्याचे महत्त्व सांप्रत पुष्कळ वाढले आहे, अद्यापि वाढत आहे, व पुढेंहि वाढणार आहे. ह्या सर्व गोष्टी स्पष्ट रीतीनें कळून येण्यास बरेच आंकडे विचारांत घ्यावे लागतील.

 प्रथमतः हिंदुस्थानचा आकार केवढा आहे, व येथील लोकसंख्या किती आहे, याचा विचार करूं. मागें दाखविलेंच आहे कीं, रशि- हिंदुस्थानची लोकसंख्या. या खेरीज सर्व युरोप खंडाचा जेवढा विस्तार आहे, तेवढा एकटचा हिंदुस्थानाचा आहे. परंतु युरोप खंडांतील तेवढ्याच प्रदेशाची लोकसंख्या सुमारें २४ कोटि असून हिंदुस्थानची २५॥ कोटि आहे. ( पृष्ठ १८ मधील टीप पहा.) म्हणून हिदुस्थानशीं इंग्लि- शांचा व्यापार म्हणजे, रशियाखेरीज सगळ्या युरोप खंडां- तील लोकसमूहांपेक्षां जास्त लोकसमूहाशीं त्यांचा व्यापार असे स्पष्ट झालें; व अशा दृष्टीनेंच ह्या व्यापाराचा त्यांनीं विचार केला पाहिजे. हिंदुस्थानची ही २५ कोटि प्रजा सर्व प्रदेशांत सारखी वाटलेली नाहीं. नद्यांच्या कांठीं