पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/6

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ) पुस्तकांतील संबंध मराठी वाचकांस समजण्यास अवघड आहे असें वाटलें, तेथें स्पष्टीकरणार्थ टिपा दिल्या आहेत. ब्रिटिश अमलांतील एकंदर वसाहती व देश हीं प्रारंभी एका ठिकाणी दिली आहेत. मूळ पुस्तकांत प्रथम वसाहतींसंबंधी दोन प्रकरणें असून नंतर हिंदुस्थानासंबंधी दोन प्रकरणें आहेत: परंतु हिंदुस्थानासंबंधी प्रकरणें वाचकांस विशेष सुलभ व मनोरंजक वाटण्याचा संभव असल्यामुळे तीं येथें प्रथम दिलीं आहेत; व ह्या फरकाच्या अनुरोधानेंच पुस्तकाच्या नांवांतहेि थोडा फरक केला आहे. वसाहतींसंबंधी प्रकरणांचा आपल्या देशाशीं साक्षात् संबंध नसल्यामुळे तीं वाचकांस विशेष महत्वाचीं वाटणार नाहीत; तथापि ज्या ब्रिटिश राष्ट्रांत आपण सांप्रत राहत आहों, त्याचा विस्तार कसकसf होत गेला, व सांप्रत केवढा आहे, ह्याविषयीं थोडी वाहत माहिती सवांस असणें आवश्यक आहे, असें कोणीहि। कचूल करील. ह्या वसाहतींसंबंधी प्रकरणांतील पहिल्या प्रकरणांत इंग्लंदच्या इतिहासाचा पुष्कळ ठिकाणीं संबंध आला असल्यामुळे बरेच ठिकाणी टिपा देऊन तो भाग मुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत "|2| *'°दच्या इतिहासाची थोडी बहुत माहिती मराठी "*"संहैि। असणें इष्ट दिसतें; व ट्रेनिंग कॉलेनाच्या `यासक्रमांत अलीकडे हा विषय सामील करण्याचाहि इंतु हीच असावा.