पाहिजेत; कारण त्यांना तोटे म्हणून म्हणून हे तंटे बखेड़े
स्पष्ट रीतीनें ध्यानांत आणिल्या हिंदुस्थान ताब्यांत असल्यापासुन जे आहेत ते हे तंटे बखेडे होत. सोसण्यापासून त्यांना फायदे काय आहेत ते पाहूं.
इतर ब्रिटिश वसाहतींपासून त्यांना जे फायदे
होतात ते पुढें लिहिल्याप्रमाणेंः-
१- इंग्लंदांतील लोकसंख्या फार वाढत चालल्या- मुळे त्या वाढणाऱ्या लोकसमूहाला ह्या वसाहतींमुळे राहण्यास नवीन जागा झाली आहे.
२- ह्या वसाहतींमुळे त्यांचें सामर्थ्य फार वाढलें आहे.
३ - ह्या वसाहतींमुळें त्यांच्या मालाचा खप फार वाढला आहे.
इतर वसाहतींपासून होणारे हे तिन्ही फायदे हिंदुस्थानापासून त्यांना होत आहेत, असें म्हणतां येत नाहीं. इंग्लिशांच्या वाढत चाललेल्या लोकसमूहाला राह ण्यास हा देश हल्लीं उपयोगी पडत नसून पुढेहि पडण्याचा संभव नाहीं. कांहीं इंग्लिश लोकांस चाकऱ्या व काम- काज हिंदुस्थानांत मिळेल; परंतु हा देश असा आहे कीं, जो कोणी येथें येतो तो इंग्लंदांत परत जाण्याच्या आशेनें येतो; स्वतःचें घरच तो ह्या देशांत बांधील असा हा देश नाहीं; कारण येथील हवा
कीं, ती त्या लोकांस मानवत नाहीं.
इतकी उष्ण आहे युरोपांतील प्रौद
पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/73
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७१)