शेतांस पाणी मिळालें; व त्या एंजिनीयरांच्या ह्या सत्कृ-
त्यामुळे गरीब व श्रीमान् ह्या दोघांसहि त्यांचे कापसाचें
पीक निर्भयपणें प्राप्त झालें. ईजिप्तांतील लोक ह्या
धरणास “ ब्रिज् ऑफ् ब्लेसिंग्ज् " ( सुखाचा पूल )
असें म्हणतात. हिंदुस्थानांत सिंधु व गंगा ह्या मोठाल्या
नद्या व दुसऱ्या पुष्कळ लहान लहान नद्या अशाप्रका-
रच्या धरणाच्या कामास फार उपयोगाच्या आहेत;
मात्र हीं धरणे बांधण्यास खर्च लागणार आहे. तेव्हां
शेतकीला कमी खर्च लागेसें करणें, व पडीत जमीन लाग-
वडी खाली आणणें, ह्या गोष्टींस जरूर काय ती भांड-
वलाची व श्रमाची आहे.
दूसरे असे आहे कीं, हिंदुस्थानांत दळणवळ-
णाच्या साधनांची फार उणीव आहे. अशा विस्तीर्ण
देशांत जिकडे तिकडे दळणवळणाचे मार्ग खुले होण्यास
किती तरी मैल रेलवे पाहिजे. ग्रेट ब्रिटन व आयर्लंद
हिंदुस्थानांतील मिळून १८,००० मैल रेलवे आहे; आणि
हिंदुस्थानचें क्षेत्रफळ ह्यांच्या ११ पट
असतांहि येथें इ. स. १८८४त ११,००० मैलच रेलवे
होती. तथापि रेलवे व पाटबंधारे ह्या उपयुक्त कामांक-
डेच सरकारचें हल्लीं फार लक्ष आहे. इंग्लंदांत रेलवे,
ट्राम
वे व ह्यांसारखी दुसरी कामें लोकांनींच खाजगी
रीतीनें आरंभिलीं आहेत. परंतु हिंदुस्थानांत जर हीं
कामें सरकारनें केली नाहीत, तर ती कधीहि घडून