व्यापाराच्या वृद्धीचें वर दाखविलेले प्रमाण नक्की नसून
वास्तविक प्रमाण पुष्कळ अधिक असले पाहिजे, ही
गोष्टहि आपण लक्षांत आणिली पाहिजे. " सरासरीनें
हिंदुस्थानांतील रेलवेपासून शेकडा ५ टक्के व्याज सुटतें;
व पाटबंधाऱ्यांच्या कामांपासून सुमारें शेकडा ६ टक्के
सुटतें. " तसेंच, जेव्हां ही पाटबंधाऱ्यांची रीति अधिक
पूर्णतेस येईल, तेव्हां हल्लींहूनहि जास्त नफा खचित
होईल. हल्लीं देखील वायव्येकडील प्रांतांत पाटबंधाऱ्यां
पासून शेंकडा ८ टक्के व्याज सुटत आहे. तसेंच इ.
स. १८७८/७९ च्या दुष्काळामध्ये १५/१६ कोटि
रुपयांचीं धान्यें पाटबंधाऱ्यांमुळे बचावली गेली. ह्या
पाटबंधाऱ्यांस एकंदर जो खर्च आला, तो सर्व ह्या एका
वर्षांत भरून आला, इतका मोठा फायदा त्या वेळीं
झाला. " (एच्. एस्. कनिंग्हॉम ह्यांचें पुस्तक, पृष्ठ ३७ )
गहूं व कापूस हे जिन्नस बाहेर पाठविण्याचा
व्यापार उत्तरोत्तर वाढत आहे; व पुढेंहि वाढतच जाणार.
हल्लीं ज्या मार्गानें इंग्लिशांचे दीर्घ प्रयत्न सुरू आहेत, त्याच
मार्गाने पुढे जसजसे ते सुरू राहतील, तसतसा त्यांनी तयार
केलेल्या जिनसांचा खप हिंदुस्थानांत अधिकाधिक होत
जाईल; आणि उलट पक्षी इंग्लिशांस लागणारे कच्चे पदार्थ
व धान्यें ह्यांचा पुरवठाहि त्यांना हिंदुस्थानांतून अधिकाधिक
होऊं लागेल. हिंदुस्थानांतील लोक जितका जितका अधिक
माल उत्पन्न करूं लागतील, तितका तितका ते ब्रिटिश