आणिल्या म्हणजे, ईजिप्तच्या राजकारस्थानांसंबंधानें
इतर कोणतेंहि राष्ट्र उदासीन राहिलें, तरी इंग्लिशांस
तसें करितां येणार नाहीं, हे उघड आहे.
आतां क्षणभर कल्पना करूं कीं, हिंदुस्थानांतून
इंग्लिशांना रशियानें हकलून दिलें, अगर तेच हा देश
सोडून देऊन परत इंग्लंदास गेले; असे झाले असतां काय
होईल बरें ? हल्लीं आहे त्याचप्रमाणे व्यवस्था पुढे चालेल
हिंदुस्थान इंग्लिशांच्या
काय ? खरोखर चालणार नाहीं.
ताब्यांतून गेल्यानें
पहिल्या कल्पनेप्रमाणे पाहिलें अ-
होणारे तोटे,
सतां, इंग्लिशांस हकलून देण्यास रशियाबरोबर त्यांचे
मोठ्या निकराचें युद्ध होऊन त्यांत
त्यांचा पराभव झाला पाहिजे. अर्थात् अशा घोटाळ्या-
मुळे हिंदुस्थानांत ब्रिटिश मालाचा हल्लीं जो खप होत
आहे त्याला म्हणजे ब्रिटिश व्यापाराला भयंकर धक्का
बसेल; आणि अशांतूनहि जर कदाचित् त्यांचा व त्यां-
च्या इतर वसाहतींचा ह्या देशाशी थोडा बहुत व्यापार
शिल्लक राहिला, तर रशिया शत्रुत्वामुळे जकाती वगैरे
बसवून तोहि बंद करण्याचा प्रयत्न खचित करील. आ-
तां दुसन्या कल्पनेप्रमाणे इंग्लिशांनीच हा देश सोडून
दिला तर, १४०० वर्षांपूर्वी ब्रिटनमधून रोमन लोकांनीं
पाय काढिल्यामुळे तेथें ज्याप्रमाणे थोडी बहुत बेबंद
पातशाही माजली होती, त्याप्रमाणे हिंदुस्थानांत खरो-
खर माजेल. अशी स्थिति आली म्हणजे ह्या देशाच्या