पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/98

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९६)


मध्ये ( ख्रिस्ती धर्माच्या पुस्तकामध्यें ) वर्णन आढळते. ह्या देशांविषयीं विचार केला असतां ध्यानांत येईल की, युफ्रेतिस व नैल ह्यांसारख्या नद्यांच्या कांठीं राहणाऱ्या लोकांनी ह्या राज्यांची स्थापना केली होती. ईजिप्त व बाबिलन वगैरे देश भरभराटींत होते, ह्याचं कारण तेथील जमीन फार सुपीक होती हे होय. तसेंच त्या देशांतील नद्या तेथील लोकांस परस्परांशी व्यापार करण्यास एक फार उत्तम साधन झालें होतें, हेंहि त्यांच्या भरभराटीचें एक कारण होतें. - वरील काळाच्या जरा अलीकडे आलो असतां, त्या काळीं सुधारलेली सर्व राष्ट्र भूमध्य समुद्राच्या आसमंतात् होतीं, अर्से आढळते.टायर, ग्रीस, रोम व कार्थेज हीं चार राष्ट्रे अशा प्रकारची होत. हीं सर्व एकमेकांशीं व्यापार करीत, व ईजिप्त देशाशी ह्यांचा व्यापार चालत असे. तसेच ह्यांनी युरोप, एशिया व आफ्रिका ह्या तिन्ही खंडांत भूमध्य समुद्रा- च्या आजूबाजूंस वसाहती स्थापिल्या होत्या. सुधारणेच्या संबंधानें ईजिप्त व बाविलोनिया ह्या देशांतील प्राचीन लोकांस ह्या राष्ट्रांनी मार्गे टाकिलें.कारण एकाच नदीच्या तीरावर कोंडून राहिलेल्या त्या लोकांपेक्षां ह्य- ना सुधारणा करण्याची अधिक साधने अनुकूळ होतीं. आपणांस असे दिसून येतें कीं, जेव्हां सुधारणेनें नदी-तीर सोडून समुद्र किनारा आपले घर केलें, तेव्हां तिच्या वृद्धींत मोठें अंतर पडलें. भूमध्य