पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/99

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९७)

समुद्राच्या आसपास असलेल्या ह्या चार देशांपैकीं रोमचे लष्कर सर्वांत जास्त होतें, व व्यापार कमी होता; म्हणून कांहीं काळानें रोमन लोकांनी टायर, ग्रीस व कार्थेज हे देश जिंकून घेतले, व भूमध्य समुद्राचा सर्व किनारा तसेंच ब्रिटन देश ह्या आपल्या ताब्यांत आणिला. काळापर्यंत सुधारणेच्या टप्प्याच्या बाहेर होता, तो त्यां- नीं जिंकून ब्रिटिश लोकांना सुधारणेच्या मर्यादेच्या आंत आणून सोडिलें, हा त्यांजवर रोमन लोकांनी मोठा उप- कार केला.


 कित्येक शतकें भूमध्य समुद्र में सुधारणेचे माहेर घर होतें. जरी रोमन राष्ट्रावर एका बाजूने गाथ ( फ्रान्स ) व जर्मनी ह्यांनीं व दुसऱ्या बाजूनें मुसलमान लोकांनी स्वाच्या केल्या, तरी युरोपांतील राष्ट्र भूमध्य समुद्रालाच धरून होतीं. त्यांचा बहुतेक व्यापार भूमध्य समुद्रांतून व युरोप खंडाच्या उत्तरेकडील देशां- मधील लहान लहान समुद्रांतून चालत असे. ह्याशिवाय जो थोड़ा बहुत व्यापार राहिला, तो फक्त हिंदुस्थानाशीं चालत असे, व तो कारवानांच्या द्वारें चालत असे. हे कारवान हिंदुस्थानांतील जिन्नस भूमध्य समु द्राच्या किनाऱ्यापर्यंत आणून टाकीत; व नंतर त्या जिनसांचा खप ज्या देशांत होत असे, त्या देशांत ते जलमार्गानें पाठविण्यांत येत. खुद्द हिंदुस्थानाविषयीं त्या लोकांस थोडीच माहिती असे, चीन देशाची त्या