गाल, नार्वे व स्वीडन ह्यांसारख्या देशांची गोष्ट सोडू- नच द्या; परंतु युरोपांतील मोठाली सर्व राष्ट्र-ग्रेट विटन व आयर्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, ऑस्त्रिया व तुर्कस्थान- हीं एकत्र केलीं असतां जो प्रदेश होईल, त्यापेक्षांहि हिंदुस्थान देश मोठा आहे, असें समजलें पाहिजे. तेव्हां हिंदुस्थानावरील इंग्लिशांची राज्यसत्ता म्हणजे रशिया- शिवाय राहिलेल्या युरोपावरील त्यांची राज्यसत्ता अ म्हणण्यास कांही हरकत नाहीं.
आतां हिंदुस्थान देश आकाराने जरी जवळ जवळ युरोपाइतका आहे, तरी इतर बाबतीत युरोपाहून फार भिन्न आहे. फ्रान्स, जर्मनी व स्पेन ह्यांसारखे पुष्कळ देश युरोपांत आहेत. ह्या प्रत्येकांत जे लोक राहतात ते सर्व एकच भाषा बोलतात; आणि त्यांच्या रितीभाती सारख्या असून धर्महि वहुतांशी एकच आहे. जर्मनी किंवा फ्रान्स ह्यांतील प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणीं स्वदे- शप्रीति असते; जरूर पडल्यास स्वदेशासाठी लढण्यास तो तयार असतो; आणि रशियन लोक किंवा स्पेन देशांतील लोक ह्यांना स्वदेशावर स्वारी करण्यास मदत करण्याचे त्याच्या कधीं स्वमीहि येत नाही.
हिंदुस्थानांत अशा प्रकारची स्थिति आढळावयाची नाही. येथील स्थिति कशी आहे याची कल्पना होण्यास जाति, भाषा अगदी साधे उदाहरण घेतले पाहिजे. सर्व युरोप आणि धर्म, खंडास एकाएकी मोठा थोरला धक्का बसला,
पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७ )
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/1b/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%80.pdf/page19-600px-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%80.pdf.jpg)