पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१ )

परंतु त्यांतून जाण्या येण्यास खिंडी नसत्या तर तो फार फायदेशीर झाला असता. नकाशाकडे थोडेसे लक्ष दिल्यास असे दिसून येईल की, सिंधु नदीस येऊन मिळणाऱ्या एका नदीचा उगम अफगाणिस्थानांत असून खैबर खिंडीच्या रस्त्यानें पर्वतामधून ती हिंदुस्थानांत वाहत येते. ज्या खिंडी- तून स्वाऱ्या करणारे लोक असंख्य वेळा आले आहेत ती हीच खैबर खिंड होय. सिंधु नदीस मिळणाऱ्या ह्या नदी- वरच अफगाणिस्थानची राजधानी में काबूल शहर तें चसलेलें आहे. काबूलच्या कांहीं पश्चिमेकडे हिरात हैं शहर आहे. म्हणून हिरात ज्याच्या कबज्यांत आहे त्याला काकुलास येण्यास कांहींच अडथळा राहिला नाहीं. ह्याप्रमाणें तो काबूल येथें येऊन दाखल झाला म्हणजे, हिंदुस्थानावर स्वाऱ्या करणारे लोक ज्या नदी- च्या कांठांनी ह्या देशांत शिरले होते, त्या नदीशीं तो येऊन ठेपला, असें होईल. ह्या रस्त्यानेच एकामागून एक विजयी लोक हिंदु-. स्थानांत आले असून त्यांची लांबच लांब मालिका हिंदूंची ( आर्यांची ) लागून गेली आहे. ती फार मोठी स्वारी. असून इतकी प्राचीन काळापर्यंत पोहोंचली आहे की, तिचा पाठीमागें तल्लास लावीत जा- ण्याचा प्रयत्न करूं लागलों, तर आपली कल्पना - शक्ति गुंग होऊन जाईल. तथापि हिंदु (आर्य ), अफ- . गाण व मोगल ह्या ३ लोकांनी हिंदुस्थानावर ज्या मोठा-