पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३ )

ते ख्रिस्ती लोकांना जितकें पाण्यांत पाहतात तितकेंच हिंदूंनाहि पाण्यांत पाहत असत. स्वधर्मप्रसाराच्या वेडानें अफगाण लोकांस उत्तेजन आलें होतें; व हिंदुस्थानावर स्वारी केल्यानें आपणांस पुष्कळ लूट मिळेल, असाहि मोह त्यांस उत्पन्न झाला होता. म्हणून गिझनीच्या महंमु- दास पुढारी करून ते झपाट्यानें हिंदु लोकांवर सरसावून आले. हिंदूंचें व अफगाणांचे युद्ध मोठ्या निकराचें झालें, परंतु अखेरीस अफगाणांस जय मिळाला, व त्यांनी हळूहळू हिंदुस्थानांत मुसलमानी राज्यें स्थापिलीं; आणि बहुतेक ठिकाणी त्यांनी हिंदूस दास्यत्वाच्या स्थितीस नेऊन पोहोंचविलें, ही दुसऱ्या स्वारीची हकीगत झाली.
 परंतु अफगाण लोकांच्या हातीं फार काळपर्यंत शांततेनें सत्ता राहिली नाहीं. इंग्लंदांत ८ वा हेन्री राजा राज्य करीत होता त्या सुमारास (इ. मोगल लोकांची स्वारी. स. १५०० च्या सुमारास ) मध्य एशियांतून मुसलमान लोकांची एक नवी टोळी हिमालय पर्वतांतून हिंदुस्थानाकडे शिरकाव करूं लागली, व हिनें अफगाण लोकांच्या फौजेच्या पिछाडीवर हल्ला केला. हे नवीन आलेले लोक मोगल होत. ह्यांच्या पूर्वी आलेल्या अफगाण लोकांपेक्षां हे जास्त बळकट होते; व कालेंकरून त्यांनी अफगाण लोकांस जिंकिले; आणि दिल्ली शहर बळ- कावून त्या ठिकाणी आपल्या पुढच्यास “मोठा मोगल " (ग्रेट मोगल ) ही संज्ञा देऊन त्याची स्थापना केली.