पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६ )

च्या सत्तेचा -हास झाल्यामुळे सर्वत्र अव्यवस्था होणें साहजिकच होतें. राज्य चालविणारे सर्व आपापसांत भांडूं लागले तर चांगली राज्यव्यवस्था चालणें अश- क्यच आहे; म्हणून दरोडखोरांच्या पेंढा-यांच्या टोळ्या उद्भवल्या; व त्यांचे जे पुढारी होते त्यांनीं आपणांस प्रत्यक्ष स्वतंत्र राजे करून घेतले; आणि मोगल बादशाह व त्यांचे नवाव ह्या दोघांच्याहि सत्तेस ते तृणवत् मानूं लागले. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला कीं, हिंदु- स्थानांत झपाट्याने झोटिंग पादशाही सुरू झाली; व्यापार मंदावला व धंदा काय तो शिपायगिरीचा राहिला. है शिपाई लोक पगार घेऊन, ही नाहींतर ती, कोणती तरी बाजू धरून लढाई करीत असत.
 अशा ह्या अव्यवस्थित स्थितीचा ज्यांच्यावर वाईट परिणाम व्हावयाचा असे कित्येक लोक त्या वेळी हिंदुस्थानांत होते. हे युरोपियन व्यापारी होत. मोग- युरोपियन लोकांच्या लांच्या पहिल्या स्वारीच्या सुमारास वसाहतींचा प्रारंभ. केप आफ गुड होपास वळसा घालून त्यांनी हिंदुस्थानास येण्याचा रस्ता शोधून काढिला होता; व व्यापारासाठी हिंदुस्थानांतील समुद्र किनारच्या गांवांतून ह्यांनी वखारी घातल्या होत्या. पोर्तुगीज, दच, इंग्लिश व. फ्रेंच अशा क्रमानचे हे लोक हिंदुस्थानांत आले, जे इंग्लिश लोक प्रथम आले, ते ईस्त इंदिया कंपनीपैकी इसमें होते. हल्लीं जशा रेलवे कंपन्या आहेत, तशाच प्रकारची