पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५४ )
प्रकरण दुसरें
हिंदुस्थानची हल्लींची स्थिति कशी आहे व हा देश इंग्रज लोक ताव्यांत कां. ठेवितात.


 हिंदुस्थानांतील ब्रिटिश राज्यसत्तेविषयी पूर्णपणे विचार करणें सांप्रत अत्यन्त महत्त्वाचं आहे; कारण अलीकडील थोड्या वर्षांत ह्या देशांत विद्येचा विलक्षण प्रसार झाल्यामुळे राजकीय महत्त्वाच्या अनेक गोष्टी हल्लीं येथें घडून येऊं लागल्या आहेत, व त्यांमुळे ह्या विषयास फार महत्त्व आलें आहे. म्हणून हिंदुस्थानची हल्लींची स्थिति कशी आहे, व ब्रिटिश सत्ता येथें कायम राखण्यासाठीं युरोपांतील राष्ट्रांशी लढायाहि इंग्लिशांनी कां कराव्या, हें समजून घेण्यासारखे आहे.
 ह्या प्रश्नाचा व्यवहारदृष्टचा विचार करावयाचा आहे. हिंदुस्थानासारखें विस्तीर्ण राज्य आपल्या ताव्यांत असावें, अशा प्रकारच्या वैभवाची इंग्लिशांना विशेष पर्वा आहे किंवा नाहीं, ह्याचा विचार येथें कर्तव्य नाहीं. तथापि हें राज्य त्यांच्या ताब्यांत असल्यामुळे त्यांना कोणते महत्त्वाचे फायदे सांप्रत होत आहेत, व कांहीं भयंकर प्रसंग गुदरून हें त्यांच्या ताब्यांतून गेल्यास त्यांचे व त्यांच्या वंशजांचे कोणते तोटे होणार आहेत, ह्याविषयीं विचार करावयाचा आहे. हिंदुस्था- नाचें कांहींका होईना, आपला त्याच्याशीं कांहीं संबंध