अशासाठी की तसाच प्रसंग आल्यास इंग्लंदाहून आणि- लेल्या सैन्यास सरहद्दीच्या अगदीं नजीकच्या बंदरांत उतरून ताबडतोब धोक्याच्या ठिकाणीं नेतां यावें.
हिंदुस्थानच्या संरक्षणाच्या कामी इंग्लिशांस यश येणें मुख्यत्वें दोन गोष्टींवर अवलंबून आहे. ह्यां- पैकी पहिली गोष्ट अफगाणिस्थानाशीं त्यांचा संबंध, ही होय. त्या देशांतून आल्याशि ह्या संरक्षणासूर्व- वाय रशियन लोकांस हिंदुस्थानांत येतांच स्थानाचे महत्त्व येणार नाहीं. एक तर ह्या कामी त्यांस अफगाण लोकांचें साहाय्य मिळालें पाहिजे; अथवा अफ- गाण लोकांशी लढाई करून आपला रस्ता त्यांना जब- रीनें खुला करून घेतला पाहिजे. रशियाच्या मनांत स्वारी करण्याचें आल्यास त्याला लढाई करण्याचाच प्रसंग यावा, असा इंग्लिश सरकारचा हेतु असून त्या 'धोरणानेंच त्यांची कारस्थानें हल्ली सुरू आहेत; म्हणजे अफगाणिस्थानच्या अमिराशीं जितका मित्रभाव ठेववेल, तितका ठेवण्याची खटपट आहे. अफगाण लोक जर रशियास अनुकूळ झाले तर त्यांना १,००,००० सैन्य आयतेंच मदत मिळाल्याप्रमाणे होईल. हे अफगाण लोक लिचेपिवे नसून ज्यांनीं पूर्वी दोनदां हिंदुस्थान जिंकिलें अशा लोकांचे हे वंशज होत. आतां अफगाण लोक प्रतिकूळ असतांहि जर रशियन लोक ह्या देशांत शिर- तील तर ते रानटी अफगाण लोक इंग्लिशांच्या बाजूस
पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/७०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६८ )
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/1b/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%80.pdf/page70-600px-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%80.pdf.jpg)