( ८१ ) शेतांस पाणी मिळाले; व त्या एंजिनीयरांच्या ह्या सत्कृ- त्यामुळे गरीव व श्रीमान् ह्या दोघांसहि त्यांचें कापसाचे पीक निर्भयपणें प्राप्त झालें. ईजिप्तांतील लोक ह्या धरणास " ब्रिज ऑफ् ब्लेसिंग्ज् " ( सुखाचा पूल ) असें म्हणतात. हिंदुस्थानांत सिंधु व गंगा ह्या मोठाल्या नद्या व दुसऱ्या पुष्कळ लहान लहान नद्या अशाप्रका- रच्या धरणाच्या कामास फार उपयोगाच्या आहेत; मात्र ही धरणे बांधण्यास खर्च लागणार आहे. तेव्हां शेतकीला कमी खर्च लागेसें करणें, व पडीत जमीन लाग- वडी खाली आणणें, ह्या गोष्टींस जरूर काय ती भांड- वलाची व श्रमाची आहे. दुसरे असे आहे कीं, हिंदुस्थानांत दळणवळ- णाच्या साधनांची फार उणीव आहे. अशा विस्तीर्ण देशांत जिकडे तिकडे दळणवळणाचे मार्ग खुले होण्यास किती तरी मैल रेलवे पाहिजे. ग्रेट ब्रिटन व आयर्लंद हिंदुस्थानांतील मिळून १८,००० मैल रेलवे आहे; आणि हिंदुस्थानचें क्षेत्रफळ ह्यांच्या ११ पट रेलवे. असतांहि येथें इ. स. १८८४त ११,००० मैलच रेलवे होती. तथापि रेलवे व पाटबंधारे ह्या उपयुक्त कामांक- डेच सरकारचें हल्लीं फार लक्ष आहे. इंग्लंदांत रेलवे, ट्राम वे व ह्यांसारखी दुसरी कामें लोकांनीच खाजगी रीतीनें आरंभिली आहेत. परंतु हिंदुस्थानांत जर हीं कामें सरकारने केली नाहीत, तर ती कधींहि घडून
पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/८३
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/1b/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%80.pdf/page83-600px-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%80.pdf.jpg)