पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९५ ) अवश्य गोष्ट म्हटली म्हणजे त्यांचा प्राचीन इतिहास थोडा बहुत तरी माहीत असणें ही होय. हा इतिहास समजून घेण्यासाठी आपणांस बन्याच प्राचीन काळाचा विचार करावा लागणार आहे. “ रोम एका दिवसांत बांधून झालें नाहीं, " अशी इंग्रजीत एक * म्हण आहे, आणि रोमन लोकांच्या ताब्यांत कोणत्याहि काळीं जेवढा प्रदेश होता, त्यापेक्षां ब्रिटिश राज्यामध्यें अधिक प्रदेश आहे. शिवाय ह्या राज्यांतील कित्येक प्रदेश तर असे आहेत की, ते प्रदेश पृथ्वीच्या कोणत्या तरी भागावर असतील, असें रोमन लोकांच्या स्वप्नींहि नव्हतें कारण त्या काळी अमेरिका खंडाचा शोधच लागलेला नव्हता. तेव्हां अशा प्रकारच्या ह्या विस्तीर्ण ब्रिटिश राज्याचा विस्तार कसकसा होत गेला, ह्या विषयींच्या इतिहासाचा संबंध फार प्राचीन काळापर्यंत पोहोचणे साहजिक आहे, तसेच ह्या राज्याच्या विस्ताराच्या इतिहासाचा संबंध फक्त इंग्लंदाच्या किंवा युरोपाच्या इतिहासांशींच आहे असें नाहीं; तर सर्व जगाच्या इति- हासाशीं आहे, हे उघड आहे- बाबिलन व ईजिप्त ( मिसर देश ) ह्यांसारख्या अति प्राचीन काळच्या सुधारलेल्या देशांत्रिषय वायवला- 2

  • "Rome was not built in a day. " a

मूळ इंग्लिश म्हण होय. ह्याच अर्थाच्या मराठी म्हणी, "पी हळद, हो. गोरी, आज खाई तूप, उद्यां पाही रूप, " वगैरे आहेत. 22.66