पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/122

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११७) भाकरी थापतांना फुटत नाहीत, व त्याची भाकरी रुचकरही लागते. गव्हांची कणीक जात्या चिकण आहे तरी तिला देखील अगोदर एकदोन तास भिजवून मुरवावी लागते. आणि । मग तिला खूब जोराने मळून तिंबवावी लागते. तेव्हा तिच्या रोट्या पाहिजेत तितक्या पातळ होऊन रुचकर लागतात. ह्या गोष्टी नित्य प्रचारांतील असल्यामुळे क्षुल्लक वाटतील, पण त्यांतील मुख्य तात्पर्य ध्यानांत धरण्याजोगे आहे. ह्या वरील तत्वाप्रमाणे पाहिले तर हिंदु व मुसलमान लोकांचा पहिला जोराचा आवेश कमी झाल्यामुळे बरेच नरम होऊन ते आतां शुद्धीवरही आले असतील. यास्तव अशावेळी त्यांजवर शांत होण्याचे उपचार कोणी केले तर व्यर्थ न जातां पुष्कळ गुणाकारी होणार आहेत. ह्मणून आतां उपेक्षा न करितां व विलंब न लावतां हिंदु मुसलमानांचे भांडण मिटवून उभयपक्षांचे पूर्ववत् सख्य होईल अशा तजविजीचे उपाय सुरू करणे इष्ट आहे. पुण्यातील हिंदु व मुसलमान लोक समजदार आहेत व त्या दोन्ही पक्षांत प्रतिष्ठित व पोक्त असे वजनदार लोकही बरेच आहेत, त्यांच्या विचाराने उभयपक्षांचा समेट करण्याचा घाट घातला असता त्याचा अधिक उपयोग होईल. पुण्याची सार्वजनिक सभा ही लोकांच्या कल्याणाकरितां स्थापन झालेली आहे. तिने कोणत्याही जातीचा, उद्योगाचा व धर्माचा भेदाभेद न करितां सर्व जातींच्या, सर्व धर्माच्या व उद्योगांच्या लोकांचा पुणे सार्वजनिक सभेत समावेश केला आहे. कायदेकानूंच्या योगाने किंवा सरकारी नोकरांच्या हातून रयतेस कांहीं इजा होत असली तर ती दूर करण्याचा सभा उद्योग करिते इतकेच नाही, तर सन १८७७-७८