पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/35

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२९) विचार करून पाहिलात का? अहो, ह्या प्रदेशांत आपणा मुसलमानांची जात अति अल्प आहे. पण हिंदु जातीचा भरणा आपल्या मुसलमान जातीहून दसपट किंवा वीसपट देखील जास्त होईल. एवढ्या मोठ्या समाजावर आपण च-. ढाई करून गेलो आणि दांडगाई सुरू केली तर सर्व हिंदूंपुढे आपला निभाव लागेल का? हिंदुलोक सौम्य असल्यामुळे दांडगाईस प्रवृत्त होत नाहीत हे फार उत्तम आहे. पण ते अभिमानास पडून तुमच्याशी दांडगावा करण्यास उभे राहिले तर एका क्षणांत तुमचा धुव्वा उडवून देतील. हे तुह्मी नाहीं का जाणत ? हिंदुलोक शांतवृत्तीचे असल्यामुळे आडमार्गात शिरून निकराने सामन्यास उभे राहून लठ्ठालही करीत नाहीत हे बरे आहे. पण तसलें साहस न करितां त्यांनी युक्तीचा प्रयोग योजून तुह्मांस वांकविण्याचे मनांत आणिल्यास क्षणांत तुझांस ते मेंढ्या करून सोडतील, त्यांनी तुमच्याशी कोणत्याही प्रकारे व्यवहार करण्याचे बंद केले तर तुमची वाट काय होईल? ह्याचा काही तरी विचार केलात का? हा प्रयोग पेणच्या हिंदु लोकांनी एकदिलाने सुरू करतांच तेथले मुसलमान शुद्धीवर आले. आणि पुनः दांडगाई न करण्याचे कबूल करून त्यांनी हिंदुलोकांस वचने दिली. हिंदूंनी तसला प्रयोग तुह्मांवर केल्यास तुझी सर्व प्रकारे नाडले जाल. कारण त्यांचा भरणा फार मोठा असल्यामुळे सर्व कामांत हिंदुलोक आहेतच. शेतकरी, दुकानदार, सावकार, सोनार, कासार, लोहार, सुतार, साळी, माळी, कुंभार, महार व चांभार यांच्या सर्व उद्योगांत पाहिले तरी हिंदुलोकच आहेत. इतक्या सर्व व्य