पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/40

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३४) गिरण्या इत्यादिकांसारखे मोठाले कारखाने उदयास येऊ लागले. व त्या मानाने सर्व मनुष्यांची दुःखें व अडचणी कमी कमी होऊन सुखाची अभिवृद्धि होऊ लागली. पन्नास किंवा शंभर वर्षांपूर्वी पुण्याहून किंवा मुंबईहून काशीस अथवा रामेश्वरास जाऊन परत येण्यास कमीतकमी सहा महिने तरी लागत. पण आज मनुष्यांत परोपकारबुद्धि वाढून ती एकमेकांच्या साह्यार्थ सत्कृत्ये करण्यास मनोभावाने झटत आहेत. त्या योगानें रेलगाडी, पोष्टाची उत्कृष्ट व्यवस्था, व तारायंत्र गिरण्या इत्यादिकांची समृद्धि होत आहे. व त्यामुळे सुखही वाढतच आहे. आज काशीस किंवा रामेश्वरास जाऊन परत आपल्या गांवी येण्यास ८।१० दिवस पुरतात. एक पैशाच्या कार्डावर लिहिलेला क्षेमसमाचार रामेश्वराहून पेशावरास ह्मणजे दोन हजार मैलांवर ६ वे दिवशी पोचतो. फार जरूरीच्या प्रसंगी एकदोन रुपये खर्च केले ह्मणजे हिंदुस्थानच्या एका टोकापासून पाहिजे तितक्या या देशांतील दूर अंतरावर ८ तासांत बातमी जाऊन पोचते. हे फळ कशाचें? एकमेकांवर रुसण्यारागावण्याचे किंवा मूर्खपणाने मारामारी करण्याचें ? एकमेकांवर रुसण्याचे नव्हे, तर खऱ्या प्रेमानें मनुष्यमात्राचे कल्याण व्हावें या बुद्धीने केलेल्या श्रमाचे हे फल होय. सर्व मनुष्यांनी एकमेकांशी फार सलोख्याने व सचोटीने वागून एकंदर मनुष्यजातीच्या सुखवृद्धयर्थ झटण्याचा निश्चय केल्यास आज ज्या काय सोई दिसतात, त्यांच्या शतपट जास्त सोई वाढून मनुष्यांच्या सुखवृद्धीत फार मोठी भर पडेल. स्वर्गसुख येथेच प्राप्त होईल हे सर्व मनांत आणा. उगीच भ्रमांत पडून हिंदूंशी आजवर संपा