पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/41

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३५) दिलेला स्नेह तोडून आपल्यास होत असलेल्या सुखांत विष कालवू नका. यांतच मौज आहे. तुह्मी कितीही नाहीं नाहीं मटले तरी हिंदु व मुसलमान हे उभयतां आपण एका देशांत राहतो, एका भूमातेचे अन्न खातों, यामुळे भावंडेंच आहोत. तेव्हां ते आणि आपण कितीही भांडलों तरी आज नाही तर उद्यां एक होऊंच. पण माझें मणणे असें आहे की, युरोपांतले देश व अमेरिका हे भूभाग या हिंदुस्थान देशापासून हजारों कोस लांब आहेत, तरी व्यवहाराच्या योगानें जो एकमेकांस उपयोग होत आहे तो फार सुखकर झाला आहे. काही कारणाने तो व्यवहार बंद पडल्यास आज आमचा केवढा घोटाळा होईल तो पहा. आज रॉक ऑइल (चिमणीचे तेल) हे रशिया व अमेरिका येथून इकडे लक्षावधि रुपयांचे येते, त्या योगाने आपली फार मोठी सोय झाली आहे. त्याचप्रमाणे यःकश्चित् दिवेसळया ह्या युरोपांतील स्वीडन, नार्वे, इंग्लंड व आशियांतील जपान इत्यादि ठिकाणांहून आपलेकडे येतात, त्यामुळे हुकमी उजेड एक पैशांत आपल्यास पाहिजे तेव्हां व हवा त्या वेळी करता येतो. पण काही कारणाने हा व्यवहार कांहीं काल बंद पडला तर आपले किती हाल होतील हे मनांत आणा. तात्पर्य राजापासून रंकापर्यंत मनुष्यमात्रानें गर्व न धरितां एकमेकांशी सौजन्याने वागून परस्परांच्या उपयोगी पडावे ह्मणजे एकमेकांचे कल्याण होईल. आणि तसे न करितां मूर्खपणाने एकमेकांवर रुसून फुगून वैरभाव धरिल्यास सर्वस्वी हानि होईल यांत संशय नाही. हे सर्व मनांत वागवून लोकांशी खऱ्या प्रेमाने वागून परस्परांच्या सुखवृद्धीत भर घाला हेच