पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/49

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भीरु असत ते मुसलमान होण्यास निरुपायामुळे कबूल होऊन आपला जीव वांचवीत, पण जे स्वधर्मनिष्ठ व पूर्ण दृढनिश्चयी असत ते न डगमगतां जिवावर उदार होऊन स्वधर्माची कास कदापि सोडीत नसत; अशा पुरुषांची कत्तल होई. शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी यास इसवी सन १६८९ मध्ये औरंगजेबाने संगमेश्वराहून कैद करून पुण्यानजीक तुळापूर ह्या गांवीं आपल्या छावणींत आणिलें, तेव्हां त्याला आपल्यासमोर आणवून त्यास वर सांगितल्याप्रमाणे शिरच्छेद करण्याच्या स्थली बसविल्यावर अगदी शेवटी औरंगजेबाने विचारिलें की, "बोल, मुसलमान होशील तर तुला जिवदान देतो, नाही ह्मणशील तर आतांच गर्दन काटून तुझा प्राण घेतो. बोल लौकर काय तें." हे ऐकून त्या धर्मनिष्ठ संभाजीने. उत्तर दिले की, “प्राण गेला तरी मी हिंदूचा मुसलमान होणार नाही." असा खडखडीत जबाब दिल्यावर औरंगजेबाने संतापून लोखंडाच्या सळया टोचून प्रथम त्याचे डोळे फोडले, नंतर बकऱ्याचे आंगावरचे कातडे काढतात, त्याप्रमाणे त्याच्या आंगाचें कातडे सोलून काढले. आणि मग त्याच्या शरीराचा तो मांसल गोळा झळझळीत निखाऱ्यांच्या ढिगावर टाकून जळत असतां लोखंडी सळयांनी ढोसढोसून त्याचा प्राण घेतला. अशा प्रकारे हालहाल करून संभाजीस मारिल्यावर त्याची बायको 'येसूबाई व मुलगा शाहू' ह्यांस कैद करून दिल्लीस नेऊन अटकेत ठेविलें. पंजाबाकडील शीख लोकांवर देखील धर्मांतर करून मुसलमानी धर्मात ओढून आणण्याकरितां त्याने अनेक वेळां बहुत जुलूम केले. अशी धर्म