पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/59

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ५३ ) जंबूक करी गर्जना.' ह्या वाक्याप्रमाणे सदाशिवराव मोठ्या घमेंडीने बुंदेलखंडापर्यंत आला. शिंदे, होळकर, भोंसले इत्यादिकांस त्याने अगोदरच निमंत्रणे पाठविली होती. त्याप्रमाणे तेही वाटेत त्याला येऊन मिळाले. सदाशिवरावाच्या स्वारीबरोबर बाजारबुणग्यांतले जेवतेगण फार असल्यामुळे दररोज शिधासामुग्री व घासदाण्याचा खर्च फार लागे. व पुढे पुढे तर चंदीवैरण व शिधासामुग्री मिळण्याचीही पंचाईत पडू लागली. व जवळची द्रव्याची पुंजीही सरत आली. तेव्हां सागरास गोविंदपंत बुंदेले, पन्याच्या छत्रसाल राजाने पहिले बाजीरावास दिलेल्या मुलखावर पेशव्यांकडील सुभेदार होता, त्याजकडून बरीच मोठी रकम घेतली. आणि त्याला सैन्यासहित आपल्या बरोबर घेऊन पुढे चालते झाले. ते एवढ्या मोठ्या सैन्यानिशीं व बाजारबुणग्यासारख्या भोजनभाऊ लटंबरासहित दिल्लीस जाऊन पोंचले. तो जवळचे द्रव्य अगदीं सरल्यामुळे खर्चाची पंचाईत पडूं लागली. स्वारीबरोबर मल्हारजी होळकर होता, तो पहिल्या बाजीरावाबरोबर अनेक स्वाऱ्यांत गेलेला होता. व रघुनाथरावाच्याही बराबर पुष्कळ मोहिमींवर जात असल्यामुळे लढाईचे कामांत व तत्संबंधी सर्व व्यवस्थेत तरबेज झाला असल्यामुळे त्याने सदाशिवरावास फार उत्तम मसलत सुचविली. तो ह्मणाला की, आपणास लढाईवर जाणे आहे. तेथे कोणत्या वेळेस कसा प्रसंग येईल याचा नेम नाही. याकरितां मोठाल्या जड तोफा, बाजारबुणगें, व बायकापोरें ही बराबर घेऊ नका. त्यांना पाठीमागे लावून सुरक्षित ठिकाणी ठेवावयाची मी तजवीज करतो झणजे आ