पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/7

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

fहिंदु आणि मुसलमानांत होणारे तंटे ___ व ते बंद करण्याविषयी विनंति. भाग पहिला. प्रस्तावलेख. आपल्या ह्या हिंदुस्थान देशांत सध्या हिंदु व मुसलमानांत तंटे उपस्थित करून मोठाल्या मारामाऱ्या व कोठे क्वचित खूनही करण्याचे वेड माजलें आहे. त्यामुळे उभयपक्षांचीही मोठी हानि होत आहे, असे प्रत्यक्ष दिसत असतां त्याची शांति होण्याचे अद्याप कोठे कांहींच लक्षण दिसत नसून, उलट असली नाशकारक कृत्ये करण्याचे साहस लोकांमध्ये मोठ्या आवेशाने वाढत आहेहे पाहून फार वाईट वाटते. कारण हिंदु व मुसलमान ह्यांचे धर्म भिन्न आहेत तरी, दोन्ही धर्माच्या लोकांची स्थिति सध्यां एकसारखी आहे, ह्मणजे दोन्ही धर्म एकाच राजछत्राखालची प्रजा आहे. गेल्या सातआठशे वर्षांपासून मुसलमान लोक हिंदुस्थानांत आले, व तेव्हांपासून ते या देशांत राहूं लागले. यामुळे त्यांच्या पोटांत जाणारे अन्न, पाणी व हवा ही आर्यभूमातेपासून त्यांस प्राप्त होत आहेत, यामुळे त्यांच्या आंगांत उत्पन्न होणारी हाडे, मांस व रक्त ही आ। र्यभूमातेच्या दुधापासूनच बनत आहेत, हे सर्व लोक क