(७९)
हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्.
(१४) छत्रपति शिवाजी महाराज.
( जन्म इ० स० १६३० मृत्यु १६८० )
“महापुरुष अपने युगकी प्रवृत्तियोंका प्रतिनिधि है, विचारधाराओं का
प्रतिबिंब है । वह युगका जहाँ पुत्र है, वहाँ उसका निर्माता भी होता है।
-पंडित व्यंकटेश नारायण तिवारी.
पुणे जिल्ह्यांतील शिवनेरी किल्ल्यावर इ० स० १६३० * सालीं
शिवाजीचा जन्म झाला. त्याच्या बापाचें नांव शहाजी राजे भोसले आणि
आईचें नांव जिजाबाई असें होतें. शहाजीला विजापूर दरबारकडून पुणे
प्रांतांत एक जहागीर मिळाली असून, तो स्वतः विजापूरकरांतर्फे कर्नाटकां-
तील स्वारीवर नेहमी असल्यामुळे त्या जहागिरीची व्यवस्था पाहण्या-
साठी त्याने दादाजी कोंडदेव नामक गृहस्थास पुण्याला ठोवलें होतें..
शिवाजी आणि मातुश्री जिजाबाई तेथेच रहात असत. दादोजीने त्या
जहागिरीची उत्तम व्यवस्था लावून उत्पन्न वाढविलें. तसेंच शिवाजीला
घोड्यावर बसणे, दांडपट्टा खेळणें व नेम मारणे वगैरे सरदारांच्या मुलांना
अवश्य असे शिक्षण दिलें. जहागिरीचा कारभार व न्याय वगैरे कामें कर-
तांना त्याला जवळ बसवून त्याविषयी प्रत्यक्ष बरीच माहिती करून दिली.
मातुश्री जिजाबाई आपल्यापरी रामायण व महाभात ह्यांतील आदर्श
पुरुषांच्या गोष्टी सांगून त्याचे बालमनावर उदात्त संस्कार करीत असे.
सन १६३० जेधे शकावलीप्रमाणे मानला जातो. रियासतकार श्री०- सरदेसाई, शके १५४९ सन १६२७ देतात..