पान:हिंन्दू सम्राट्.pdf/99

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८०)

हिंदुस्थानचे

हिन्दु सम्राट्

अशा उत्तम शिक्षणाचा लाभ शिवाजीला मिळाल्यामुळे त्याचे ठिकाण अनेक सद्गुणांचा विकास झालेला दिसून येतो.

 इ० स० १६४६ सालीं तोरणा किल्ला अदिलशहाचे किल्लेदाराला वश करून शिवाजीने आपल्या ताब्यात घेतला आणि तेथपासून सुमारें पंचवीस वर्षे भगीरथ प्रयत्न करून शिवाजीने तानाजी, मोरोपंत इत्यादि अनेक सहकान्यांच्या मदतीने महाराष्ट्रांत 'हिंदवी स्वराज्य स्थापन केलें. इ० स० १६७४ त रायगडावर मोठा समारंभ करून शिवाजीने आपण स्वतंत्र अशा मराठी राज्याचा राजा झाल्याचे जाहीर केले, त्याच्या आयुष्यांत प्रतापगड- चें युद्ध (ज्याला अफझुलखानाचा वध म्हटले जातें), औरंगजेबाचे तावडीं. तून आग्याहून मोठ्या शिताफीने सुटका, सुरत, विजापूर व हुबळी इत्यादि संपन्न शहरांवरील हल्ले; शिद्दी व इंग्रज ह्यांचेबरोबर झालेल्या आरमारी चक्रमकी आणि कर्नाटकांतील दिग्विजय इत्यादि अनेक प्रसंग महत्त्वाचे होत. त्यांपैकी कित्येकांवर स्वतंत्र इतिहास, नाटकें वगैरे पुष्कळ वाङ्मय मराठींत झाले आहे. त्यावरून शौर्य, दक्षता, प्रसंगावधान, चातुर्य व धर्मनिष्ठा इत्यादि शिवाजीचे अनेक गुण आपल्या नजरेस येतात.

 राज्याभिषेकानन्तर सहा वर्षांनी 'गुडघी' रोगाने छत्रपति शिवाजी महाराज स्वर्गवासी झाले. त्यांला संभाजी व राजाराम असे दोन पुत्र होते. वडील मुलगा संभाजी ह्याने बापाचे पश्चात् राज्य कारभार आपल्या हातीं घेतला.


 X इ० स० १६४४ त कोंडाणा (सिंहगड) किल्ला व प्रांत दादाजीने हस्तगत केला. शिवाजीने तेथील बंदोबस्त करून नंतर तोरण्याच्या किल्ले- दाराशी संधान बांधून तोही ताब्यांत घेतला.

- मराठी रियासत (शककर्ता शिवाजी).