पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/19

हे पान प्रमाणित केलेले आहे.



अभाव असावा असे थंड हवेच्या मानाने अनुमान होते तितका

अभाव नाहीं. Xकारण, दक्षिण दिशेकडून सूर्यकिरणांचा मारा असल्यामुळे उष्णता पुष्कळ असते व पाऊसही विपुल पडतो, ह्यामुळे वर सांगितलेल्या मैदानाच्या उत्तरेकडील उच्च भागावर ज्याप्रमाणे वनस्पति पूर्णदशेस येतात तशाच एथेही येतात. परंतु कांहीं नाजूक झाडांना एथील तीक्ष्ण हवा व रात्री सुटणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळका सहन होत नाहींत. ह्यांपैकीच आंबा व अननस हीं उत्तम फळझाडे होत. ह्याचप्रमाणे हिंवाळ्यामध्ये ह्या कटिबंधाच्या उच्च उच्च शिखरांवर युरोप व इतर समशीतोष्ण देशांतील झाडे व उष्ण देशांतील झाडे हीं एकत्र उगवलेली आढळतात. ह्या भागावर बर्फ सहसा दृष्टीस पडत नाहीं.

 दुसरा पट्टाः—हा ९००० फूट उंचीपर्यंत कल्पिला आहे.

-----
( मागील पृष्ठावरून पुढे चालू ).

एक व दक्षिणेस एक असे दोन कटिबंध आहेत. त्यांस ' समशीतोष्ण कटिबंध ' असे म्हणतात. हे अयनवृत्तांपासून उत्तरेस व दक्षिणेस ४३° आहेत. ह्या ठिकाणीं शीत व उष्ण ह्यांचे मान सरासरी सारखे असते. बाकीचे दोन कटिबंध दोन्ही ध्रुवांपासून २३साचा:स्फ्राक अंशांपर्यंत आहेत. एथे थंडी फार असते.

 X हिमालय पर्वत उष्ण कटिबंधाच्या उत्तरेस असल्यामुळे त्यावर सूर्याचे किरण लंब रेषेने कधीही पडत नाहींत. सूर्याचे किरण दक्षिण दिशेकडून वक्र दिशेने ह्या पर्वताकडे येतात. त्यांस ह्या पर्वताचा अडथळा झाल्यामुळे लंब रेषेनें किरण पडल्याप्रमाणेच ह्या पर्वताचे दक्षिण पाखरावर यांचा परिणाम होतो. ह्या पर्वताच्या उत्तरेच्या पाखरास सूर्यकिरणांचा ताप फारसा होत नाही.