पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/32

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१९



सांगितल्याप्रमाणे उत्तरेपेक्षां दक्षिणेकडे उष्णता जास्त असल्यामुळे मद्रास इलाख्यांतील लोक पाहिले तर काळे, ठेंगणे, थोडे कुरूप व हरएक प्रकारच्या सुधारणेमध्यें व मानसिक शक्तीमध्ये मागसलेले आहेत. परंतु बंगाल, वायव्येकडील प्रांत, पंजाब वगैरे उत्तरेकडील प्रांतांकडे पहा; पुरभय्ये, पंजाबी, वगैरे लोक अंगाने सदृढ व उंच असे आहेत. अर्वाचीन काळी बंगाल देश सुधारणेमध्ये व विद्येमध्ये पुढे आहे. प्राचीन काळीं प्रसिद्धीस आलेलीं व सुधारणे- च्या शिखरास पोहोंचलीं होतीं अशी राज्ये म्हणजे गोकुळ, वृंदा- वन, अयोध्या, दिल्ली वगैरे सर्व उत्तर हिंदुस्तानांत होऊन गेली. मोठमोठे विद्वान् ऋषि व त्यांचे शिष्यवर्ग हेही उत्तर हिंदुस्तानां- तच होऊन गेले. सारांश असा की, मनुष्यास राहण्यास अति योग्य ठिकाण म्हटलें म्हणजे समशीतोष्ण कटिबंध होय. व ह्यांतही उत्तम स्थान म्हटलें म्हणजे वरील कटिबंधाचा मध्यप्रदेश होय. उष्ण कटिबंधाच्या लगतचाही भाग फार चांगला नाहीं, व शीत कटिबंधाच्याही लगतचा भाग फार चांगला नाहीं.

 शिवाय, अतिशय थंडीही मनुष्यमात्रास हितावह नाहीं. युरोप- खंडाचे उत्तरेकडील देश नॉर्वे, स्वीडन, ल्यापलँड, रशियाचा उत्तर भाग वगैरे ठिकाणची हवा अतिशय थंड असल्यामुळे तेथील लोक खुजट व कुरूप आहेत. त्यांच्या मानसिक शक्तिही वृद्धिंगत झालेल्या नाहींत. ही स्थिति हिमालय पर्वतावर उच्च स्थानीं जी लोकवस्ती आहे तीमध्येही आढळते.