पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/55

हे पान प्रमाणित केलेले आहे.



४२

 पाण्याची वाफ होऊ लागली असतां उष्णता अदृश्य होते, म्हणजे थंडी उत्पन्न होते. ह्याचे प्रत्यंतरास प्रचारामध्ये अनेक उदाहरणे आहेत. पाण्याचा असा एक धर्म आहे कीं, हवेची उष्णता कितीही कमी असो, त्याच्या पृष्ठभागापासून नेहमीं बाष्पीभवन होत असते; व ह्या बाष्पीभवनास अवश्य लागणारी उष्णता तें सभोंवतीं असणाऱ्या पदार्थांमधून घेत असते. एका उथळ पितळीसारख्या भांड्यामध्ये पाणी घालून रात्रभर ठेविलें असतां ते पाणी अगदीं गार होते. पितळीसारखे भांडे घेण्याचा उद्देश इतकाच की, पाण्याला पुष्कळ पृष्ठभाग मिळावा. ह्या पाण्याचे बाष्पीभवन स्वभावतःच चालू असल्यामुळे त्यास लागणारी उष्णता पाण्यामधूनच घेतली जाते, त्यामुळे पाणी थंड होते. उन्हाळ्यामध्ये आपणांस पाणी थंड करावयाचे असल्यास आपण भांड्यास वरून फडके गुंडाळून ठेवितों, व फडके नेहमीं ओले ठेवीत गेलों म्हणजे भांड्यांतील पाणी थंड होते. ओले फडके लावण्याचा इतकाच उद्देश कीं, भांड्याच्या सर्व बाजूंनी बाष्पीभवन व्हावे. बाष्पीभवन होण्यास उष्णता पाहिजे; ती उष्णता भांड्यांतील पाण्यामधूनच

-----



( मागील पृष्ठावरून पुढे चालू. )

वाफ निघत असते; व ती वाफ एका नागमोडी नळीच्या द्वारे एका थंड पाण्याच्या पिपांतून जाते, व तिचे पाणी होऊन ते बाटल्यांमध्ये भरून ठेवितात. वाफेचे पाणी होत असतांना त्यामधून इतकी उष्णता उत्पन्न होते की, पिपांतील पाणी अतिशय उष्ण होते, व ते काढून त्याच्या जागी एकसारखे थंड पाणी येण्याजोगी तजवीज केलेली असते.