पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/74

हे पान प्रमाणित केलेले आहे.



३०

ष्णता जर वाढविली, तर तीमध्ये आणखी वाफ राहू शकते. व तिजमध्ये तशीच आणखी कांहीं वाफ घालीत गेलें म्हणजे तीसही विरण्याची परमावधि झालेली स्थिति प्राप्त होते. नंतर तिजमध्ये जास्त वाफ राहू शकत नाहीं. जास्त वाफ घातली, तर ती पाण्याचे रूपाने खाली पडते. ह्याचेच उलट स्थिति हवेची उष्णत कमी केल्याने होते.

 प्रयोगार्थ एक काचेचे लहान शामदान घ्यावे, व त्याजमध्ये अगदी कोरडी हवा भरावी. कोरडी हवा भरण्यास फार श्रम नलगे. शामदानामध्यें हवा असतेच. त्याजमध्ये सल्फ्यूरिक आसिड सारखा एकादा जलशोषक पदार्थ ठेविला म्हणजे तो हवेतील सर्व वाफ शोषून घेऊन हवा कोरडी करितो. नंतर, ते शामदान एका रबराच्या पोळीवर पालथे ठेवावे, म्हणजे नळींतील हवेमध्ये बाहेरील हवेतून ओलावा शिरत नाहीं. नंतर त्या शामदानामध्ये एका रबराच्या नळीनें वाफ घालावी. नळींतील हवेची उष्णता ५०° आहे असे समजा. इतक्या उष्णतेच्या हवेमध्ये अमुकच वाफ राहू शकते, तितकी वाफ त्या शामदानामध्ये गेल्यावर तिला विरण्याची परमावधीची स्थिति प्राप्त होते. ही स्थिति प्राप्त झाल्यावर त्या हवेमध्ये जास्त वाफ