पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/86

हे पान प्रमाणित केलेले आहे.



७३

थळा कारतो हे होय. दुसरा प्रवाह जो बंगालचे उपसागराकडून येतो तो पडत पडत एथपर्यंत आल्यामुळे त्यांतील वाफेचा संचय कमी होऊन ह्या प्रदेशामध्ये पाऊस थोडाच पडतो.

 दुसरा अल्पवृष्टीचा प्रदेश–पश्चिम घाटाच्या पूर्वेस नजीकच सुरू होतो, आणि शंभर किंवा दीडशे मैलांच्या रुंदीने थेट दक्षिणच्या उच्च प् रदेशाच्या दक्षिणेपर्यंत आढळतो. म्हणजे हा प्रदेश साधारपणे चौकोनी असून ह्याचे चार कोनांस आग्नेयीस चितूर, नैऋत्येस मैसूर, वायव्येस धुळे, व ईशान्येस उमरावती एणेप्रमाणे शहरे आहेत. ह्या प्रदेशामध्ये वऱ्हाडचा पश्चिम भाग, दक्षिण हैदराबाद संस्थानचा पश्चिम भाग, मद्रास इलाख्याचा वायव्येकडील भाग, बहुतेक मैसूर प्रांत, व आपल्या मुंबई इलाख्यापैकीं कांहीं थोडासा पश्चिमेकडील भाग सोडून पुढील जिल्ह्यांचा म्हणजे खानदेश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, बेळगांव, विजापूर, धारवाड ह्या जिल्ह्यांचा आणि कोल्हापूर, सांगली, कुरुंदवाड वगैरे कांहीं संस्थाने ह्यांचा समावेश होता. एथील पावसाचे मान पहा-धुळे शहरामध्ये २२ इंच, मालेगांवास २२ इंच, नाशिकास २९ इंच, पुण्यास ३२ इंच, कोल्हापुरास ४४ इंच, सोलापुरास २६ इंच, विजापुरास २४ इंच, बेळगांवास ५२इंच, मैसुरास ३०इंच, कोइमतुरास २३ इंच, मधु- रास ३२ इंच, तुतिकोरीन एथे १७ इंच ह्याप्रमाणे आहे. अल्प- वृष्टीचा प्रदेश सोडून आणखी पूर्वेस गेलें म्हणजे, पावसाचे मान फिरून वाढलेले दृष्टीस पडते, म्हणजे अधिक वृष्टीचा प्रदेश लाग- तो. सह्याद्रि मध्ये आड आल्यामुळे कोकणांत पाऊस पुष्कळ,