पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/93

हे पान प्रमाणित केलेले आहे.



८०

किती अवश्य आहे याबद्दल बऱ्याच प्राचीन काळापासून लोकांस

अगत्य वाटलें आहे असे दिसून येते. व ही अवश्यकता प्राप्त करून घेणे मनुष्याच्या बरेच अंशीं स्वाधीन आहे असे त्यांस वाटल्यामुळे ह्या गोष्टीबद्दल प्राचीन काळापासून प्रयत्न सुरू आहेत. मुसलमानी राज्याच्या आरंभीच भागीरथी नदीस कालवा बांधला. तसेंच, प्राचीन काळापासून मैसूर प्रांतांत तर जागजागीं पावसाचे पाणी सांठविण्यास तलाव बांधलेले आहेत व अशाच रीतीचे तलाव इतर ठिकाणही बांधलेले आढळतात. हल्लींचे अमलांत तर ह्या गोष्टीकडे म्हणजे कालवे बांधणे व तलाव बांधणे ह्याकडे सरकारने चांगलें लक्ष पुरविले आहे व ह्या संबंधाने कामे करण्याकरिता एका स्वतंत्र खात्याची स्थापना केली आहे. तलाव बांधण्याच्या संबंधानें कांहीं म्हणणे नाही. कारण, त्यांत थोडेफार पावसाचे पाणी सांठून राहतेच. परंतु कालवे बांधले असतां, अगर बांधणे झाल्यास वारंवार अशी अडचण येते की, कालव्यास पाण्याचा चांगला पुरवठा होत नाही. शिवाय, नद्यांस आडवे बांध घालून पाणी आडवून दुसरीकडे नेलें म्हणजे कित्येक ठिकाणी नदीकाठच्या लोकांस पाण्याची कमताई होते.

 इरिगेशन खात्याचे दोन हेतु आहेतः पावसाचे पाणी साठवून धरणे, व त्या योगाने उच्च प्रदेशी जामिनीस पाण्याचा पुरवठा करणे. म्हणजे आमची जी तिसरी अवश्यकता तीच पुरविण्याचा ह्या खात्याचा उद्देश आहे. हा उद्देश स्तुत्य आहे, आणि त्यापासून देशाचे फारच हित झाले आहे व होतही आहे. इतकेच की,