पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/११३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ३ ( ११९. ) महाराष्ट्रदेशांत व बहुधा सर्व मुंबई इलाख्यामध्ये विधवेस दत्तक घे- ण्यास तिच्या नवऱ्याच्या अनुमतिपत्राचें कारण नाहीं. कारण तिला स्वतः दत्तक घेण्याचा अधिकार आहे, परंतु तसें अनुमतिपत्र झालेले असल्यास, त्याला स्टांपाची किंवा रजिस्ट- राची गरज नाहीं; आणि अनुमतिपत्र अमुकच नमुन्याचें असले पाहिजे असेंही नाहीं; असा ठराव बंगालच्या हायकोर्टानें अपील नं० ११४ सन १८६६ यांत केला आहे, १५२ परंतु मृत्युपत्रानें अनुमति दिलली नसेल तर ती आतां रजिस्टर करावी लागते (१८७७ चा आ. ३ क १७). सुनेनें दत्तक घ्यावा असें मृत्युपत्रांत सांगितलेले असेल तर तो दत्तक मुलाला होतो, आजाला होत नाहीं.' मुलाची विधवा वारस झाली असेल तर तिच्या सासवेला दत्तक घेतां येत नाहीं.' तसेंच मुलाची विधवा वारल्यावर आई वारस होईल तेथेंही ह्याचप्रमाणें आहे.' परंतु मुलाची स्त्री त्याच्या अगोदर मेलेली असेल तर घेतां येईल.' १५३ १५४ १५५ १५६ १५७ ( १२०. ) आशौचांत दत्तक घेऊं नये असें मद्रासेस वैश्य जातीच्यासंबंधानें ठरले आहे. रावजी वि० लक्ष्मीबाई (इं. ला. रि. १६ मुं. ३८१) ह्यांत दत्तक घेणाऱ्या विधवेनें अशी तक्रार केली कीं, दत्तक घेतला त्या वेळेस माझें वपन झाले नव्हतें सबब यीं अशुद्ध होतें ह्मणून दत्तविधान अशास्त्र झालें. योग्य प्रायश्चित केलेलें होतें अशी साक्ष दिल्यामुळे कोर्टानें ही तक्रार कबूल केली नाहीं. हा सोनारांतील कज्जा होता. जुलमानें घेतलेला दत्तक रद्द होतो." १५७ (१२०अ.) इस्टापेलसंबंधाने बरेच ठराव झाले आहेत. एका मनुष्यानें दत्तविधान घडवि- ण्याच्या कामी मदत करून झालेला दत्तक बिनहरकत आहे अशा समजांत दत्तक घेणारास मरूं दिलें, त्यापक्षीं अशी समजूत उत्पन्न करणाऱ्या मनुष्यास त्या दत्तकाबद्दल पुढे तक्रार करितां येत नाहीं असें ठरलें (सदाशीव मोरेश्वर घांटे वि० हरी मोरेश्वर घांटे मु० हा० रि०व्हा० ११ पा० १९०). जेथें वादीच्या बापाच्या दत्तविधानाच्या वेळी प्रतिवादांचा बाप हजर होता व तें दत्तविधान आपल्या वर्तणुकीनें त्यानें कबूल केलें होतें, तें दत्तविधान योग्य किंवा अयोग्य याबद्दलची तक्रार प्रतिवादीच्या मुलास कोटें काढू देणार नाहींत. चालू कज्जांत त्या दत्तकाच्या मुलाचा दावा देवविला (चितो वि • धोंडो, मुं० हा • रि० पृ० १९२ टीप ). एकदां दत्तविधान झाले की दत्तक घेणाऱ्या बापाच्या फिर्यादीवरूनही ते ० • १५२. वीकी रि० घा० ६, पृ० १३३ १५३. करसनदास वि० लडकावाह इं० ला० रि० १२ मुं० १८५. १५४. थायम्मल वि० वेंकटराम इं० ला० रि० १० म० २०५. केशव वि० गोविंद इं० ला० रि० ९ मुं०९४. ताराचरण वि०सुरेश इं० ला० रि० १२ क० १२२. १५५. कृष्णराव वि० शंकरराव इं० ला० रि० १७ मुं० १६४. १५६. गौडाप्पा वि० गिरिमलाप्पा छा० छा० ठराव १८९४ पृ० १५५. १५७. रंगी नायकम्मा वि० अळवारचेटी इं० ला० रि० १३म० २२२.