पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/११६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ३ १०९ दत्तकप्रकरण. (ठिकाणाचा तपशील गाळला आहे. ) येणेंप्रमाणें सदरील लिहिलेले बगाईती ठिकाण व घर व गोवळ व वरकस जमीन आज मितीस तुझांस आपले स्वसंतोषानें बक्षीस देऊन हवाली केले आहे. सरकारदस्त व गांवखर्च वगैरे तुह्मीं वारून पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें उपभोग करून सुखरूप रहावें. मी हयात आहे तोपर्यंत उत्पन्न मी घेईन आणि तुह्मी आपले कुटुंबांतील माणसाप्रमाणे माझें पोषण करावें. सदरील लिहिलेले इमले स्वसंतोष देऊन हवाली केले. याजवर माझी मालकी को- णतेही प्रकारें राहिली नाहीं. आज मितीपासून मालकी तुमची. आज मितीस मला कोणाचें देणें पैसा वगैरे कांहीं एक नाहीं. सदरील दिले आहे याशिवाय माझे पाठीमागें जी जि- नगी असेल ती सर्व तुह्मांस दिली असे त्याजवर कोणाचा वारसा नाहीं. सर्व मालकी तुमची. हे पत्र आह्मी आपले अक्कलहुषारीनें स्वसंतोष लिहून दिलें. ( पुढें दस्तूर व सह्या आहेत ) (१२१.) दत्ताविधानाबद्दल आणिलेला पुरावा परस्परविरोधी असेल, तेथें कोणत्या गोष्टी अनुमानानें खऱ्या दिसतात हे पाहून निर्णय केला पाहिजे. दत्तक घेणारा बाप निपुत्रिक व वृद्ध होता, तेव्हां, दत्तविधान झाले असल्याचा संभव जास्ती आहे असा ठराव झाला ( हरधन मुकरजी वि. मथुरानाथ मुकरजी मू. इं. अ. व्हा. ४ पा. ४१४; स. वी. रि. प्रि. कौ. पा. ७१ ). (१२१अ) निपुत्रिक मयत झाला असतां त्याणे दत्तक घेतला अर्ने अनुमान प्रथम दर्शनीं काढावें ( नयळुचमी अम्मूल वि. गोपू नंदराज चेट्ट. मू० इं. अ० हा० ६ पा ३०९ ३४३). (१२१ब) क्रीत पुत्र मद्रासेकडे चालत नाहीं, आणि मुलगे असतांना पुत्रिका ठरवि- ●ण्याचे प्रयोजन राहातच नाहीं हे उघडच आहे असे स. वी० रि० वा० ५ पृ० ११४ (प्रिव्ही कौन्सिल ) यांत ठरलें आहे. परंतु जेथें आचार असेल, तेथें क्रीत पुत्र चालेल असे मला वाटतें, कारण मूळ नक्षत्र लागल्यामुळे (संकेतानें.) मूल पिंपळाच्या पारावर ठेवितात, आणि तें ठरल्याप्रमाणें कोणी सवर्ण इष्टमित्र पाळितो तो एका प्रकारचा क्रीतच होय. ही चाल या देशी अद्यापि प्रसिद्ध आहे.