पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १० वें. सार्वजनिक धर्मकृत्यें. (४९३.) पूर्वी धर्मशास्त्राच्या उगमांचा विचार करतांना पुराणेंही साम्प्रतच्या आचारांची मुख्य मूलें आहेत असें सांगितलें. त्यांचा विचार ह्या प्रकरणांत विशेष येतो. सार्वज- निक कृत्यें दोन प्रकारची असतातः एक ( १ ) इष्ट ह्मणजे यज्ञसमयी दिलेली दानें; आणि दुसरें ( २ ) पूर्त ह्मणजे पुष्करणी, वापी, तडाग, आराम ( ह्मणजे बगीचे ), देवालयें, इत्यादि लोकोपयोगार्थ बांधणे. (४९४.) याविषयीं पूर्वीच्या आवृत्तींत कांही प्रसंगवशात् उल्लेख असतील ते असोत; परंतु विशेषेकरून या बाबतींत लिहिलें गेलें नाहीं. पूर्वीच्या दिवाणी काम करण्याच्या रीतीच्या कायद्यांत ( १८१९ चा आक्ट ८ वा ह्यांत ) याविषयीं स्वतंत्र विचार नव्हता; आणि ह्या इलाख्यांत मोठा धर्मादाय व देणग्या यांची समृद्धि आहे असे नाहीं. तथापि अलीकडे कित्येक कज्जांत या विषयाचा उपयोग आहे अर्से दृ- ष्टीस पडलें, आणि नव्या कायद्यानेही याचा विचार करून, अशा लोकोपयोगी त्यांची अव्यवस्था केल्यास तिच्या बंदोबस्ताचा बराच सरळ मार्ग दाखविल्यामुळे हें प्रकरण एथें दाखल केले आहे. (४९५.) सन १८८२ चा आक्ट २०, कलम १३९, ह्यांत सार्वजनिक धर्मार्थ कृत्यांच्या संबंधाच्या दाव्यांबद्दल खाली लिहिल्याप्रमाणे ठरविलेलें आहे:- - "जेव्हां एकाद्या सार्वजनिक धर्मार्थ देणगीच्या संबंधाच्या उल्लेखित किंवा गर्भित शर्ती मोडल्याचा संशय येईल तेव्हां, अगर जेव्हां अशा देणगीची व्यवस्था करण्याकरितां कोर्टाची सल्ला घेण्याचें जरूर वाटेल तेव्हां आइव्होकेट जनरल यानें आपल्या हुद्याच्या नात्यानें, किंवा त्या देणगीशीं ज्यांचा प्रत्यक्ष निकट संबंध आहे अशा दोन किंवा तीन असामींनीं आइव्होकेट जनरल याच्या लेखी सल्ल्यानें, ज्या कोडताच्या अमलाखाली अशा देणगीचा विषय [ तलाव, देवालयें, जमिनी वगैरे ] असेल, त्या हायकोडतांत ( १ ) याविषयीं मनूची व्याख्या आहे ती येणेप्रमाणे:- एकाग्निकर्महवनं त्रेतायां यच्चहूयते ॥ अंन्तर्वेद्यां च यद्दानमिष्टंतदभिधीयते ॥ ३४