पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याज्ञवल्क्यस्मृति. जे निमग्न ते [श्रेष्ठ ]; त्यांहूनही जे [ वेदोक्त ] क्रिया करण्यांत तत्पर ते अधिक श्रेष्ठ; व आत्मज्ञान ज्यांना झालेले आहे ते [ सर्वांहूनही ] श्रेष्ठ. १९९ केवळ विद्येपासून किंवा केवळ तपश्चर्या आचरिल्यानें [ दानप्रतिग्रहास ] पात्रताः येत नाही; आचरण व हे दोन्ही गुण जेथें आहेत. त्या पुरुषास [ दानप्रतिग्रहाचें ] पात्र असे ह्मटले आहे. २२ २०० गाय, जमीन, तीळ आणि सोनें वगैरे, हीं योग्य पूजोपचारासह सत्पात्रीं द्यावीं.. अपलें बरें व्हावें असें इच्छिणाऱ्या ज्ञात्यानें कांहीं अपात्री देऊं नये.. २०१ विद्या आणि तपश्चर्या हीं ज्यामध्ये नाहीत अशानें दान घेऊं नये. जर घेईल तर तो दान देणारास व स्वतःस अधोगतीस नेईल. २०२ दररोज, परंतु विशेषतः [ ग्रहणादिक पर्वकाळासारख्या ] नैमित्तिक प्रसंगी कांहीं तरी दान सुपात्री करावें; कोणी मागितले असतांही आपल्या शक्तीप्रमाणे भक्तिपूर्वक दान करावें. २०३ सोन्यानें शिंर्गे, व रुप्यानें खूर मढविलेली, वस्त्राने आच्छादित, गुणी, दूध देणारी अशा गाईचें दान कांशाचें भाडें व दक्षिणा यांसह करावें. २०४ अशा प्रकारची गाय देणारास गाईचे अंगावर जितकी रोमें असतील तितकी वर्षे पावेतों स्वर्गप्राप्ति होते. जर ती कपिला ( सर्वांगीं काळी ) असेल तर [ दानकती ] स्वतःस व मागील सहा पितरांस उद्धरतो. २०५ जर ती उभयतोमुखी असेल तर तिचें विधानपूर्वक दान करणारा [ तिच्या व ति वत्साचे अंगावरील ] केशांचे संख्येइतक्या युगांपावतों स्वर्गवास पावतो.. २०६ वांसराचे दोन पाय आणि तोंड [ गाईच्या ] योनिद्वारांतून बाहेर दिसूं लागून जोपावेतों तिचा गर्भ पुरा बाहेर पडला नाहीं, तोंपावेतों ती गाय पृथ्वी [ तुल्य ] समजावी. १ २०७ दूध देती, किंवा दूध न देणारी पण कृश नसून रोगरहित अशी गाय कोणत्या तरी उपायांनी दिल्यापासून देणारा स्वर्गलोकी स्तुतीस पात्र होतो. २०८ थकलेल्या [ पाहुण्याचें ] आदरातिथ्य करणें, व्याधिताची सेवा करणें, देवांचें पू जन, [ द्विजांचे ] पाय धुणे, द्विजांचें खरखटें काढून टाकणे, हे प्रत्येक कृत्य गोप्रदानतु- ल्य [ समजावें ]. २०९ जमीन, दिवा, अन्न, वस्त्र, पाणी, तीळ, तूप, पांथस्थांस राहण्यासाठी ठिकाणं देणें, कन्यादान, सोनें, बळकट बैल देणें, ही दानें करणारा स्वर्गलोकीं सन्मान पावतो. २१० घर, धान्य, [ संकटप्रसंगी ] आश्रय, जोडा, छत्री, फुलांची माळ, अनुलेपन १ या स्थितींत गाय असतां तिला 'उभयतोमुखी' ह्मणतात.