पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० विवाहाविषयीं. २७ 6 बेवर ती चाल निर्विवाद पुराव्यानें शाबीत झाली तर मानावी असे भावनी वि० महाराज सिंध, इं० ला० रि० अला• व्हा० ३ पा० ७३८. यांत ठरलें होतें. सांप्रत देशभर जे 'पाट' किंवा ' 'नात्रा ' ह्मणून लागतान ते सर्व गांधर्व विवाहच मानिले पाहिजेत. तशा विवाहांच्या वेळी पाहिल्या लग्नासारखे कांहीं एक विधि किंवा कृत्य नसतें. विवाहाच्या आठ प्रका- रांपैकी अमुक विवाह कींत निषिद्ध असे सांगितलेलें नाहीं सबब गांधर्व विवाह पूर्व युगाचा आहे व तो साधारण धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे अशा हायकोर्टाच्या ठरावाला आधार दिसत नाहीं. आसुर विवाह चलतो असे कोर्टानी ठरविले आहे तर गांधर्व विवाहाविषयीं पुराव्याची विशेष सक्तीं कां असावी याला कारण नाहीं. हलवाई जातींत एक स्त्री असतां तिजपासून संतान नसेल तर दुसऱ्या एका विधवेशी पुरुष लग्न लावू शकतो. या जातीच्या विवाहास 'सगाई' लग्न असें ह्मणतात. याच कज्यांत दुसरे लग्न सधवेशोंही लागण्यास हरकत नाही, मात्र जातीने तिच्या पूर्व नवन्यास तिला प्रोस- ण्यास सामर्थ्य नाहीं असे सांगितले पाहिजे, असा चालीचा पुरावा झाला होता परंतु त्याचा निर्णय करण्याची जरूरी नाहीं ह्मणून निर्णय कोर्टानें केला नाहीं. ( कालिचरण:शा वि दखीबीबी इं० ला रि० कल० व्हा० ५ पा० ६९२. ) ( २४.) प्राचीन काळी असवर्ण स्त्रीशी विवाह होत असे; तो अनुलोम मात्र वर्ण असल्य पाहिजे; ह्मणजे उंच वर्णाच्या पुरुषपचें नीच वर्णाच्या स्त्रीशी लग्न होत असे. या नियमामुळे ब्राह्मणास चारहि वर्णांच्या कन्यांशी विवाह करण्यास अनुकूल होतें. क्षत्रियांस ब्राह्मण वर्ज करून बाकी तिन्ही वर्णांच्या मुली करितां येत असत. वै- श्यांस, स्ववर्णाची व शूद्राची कन्या करितां येत होती. शूद्रास मात्र आपल्या वर्णा- बाहेर लग्न करण्याची परवानगी नव्हती. सांप्रत तर सवणीचें मात्र लग्न होतें, असः वर्णीचा विवाह झाला असतां त्यापासून सशास्त्र संबंध होत नाहीं. ७ (२१. ). समान वर्णीत मात्र विवाह होतो ह्मणून सांगितले आहे; तेथें वर्ण ह्मणजे काय याचा निर्णय करणे जरा कठिण आहे. जे चार वर्ण सर्व स्मृतिकारांस मान्य आहेत, ते सर्व हल्लीं आहेत की नाही याबद्दल मतभेद आहे. सर्व आहेत असे मानले तरी त्यांच्या पोटीं इतक्या भिन्न भिन्न जाती हल्लीं उपलब्ध आहेत कीं, कोणती को- णत्या वर्णाचा पोटभेद हे ठरविणे कठिण आहे.. आचार पाहतां वर्णीविषयीं सांगित- लेला निर्बंध त्या वर्णाच्या पोटभेदांवर येऊन बसलेला आढळतो; ह्मणजे ब्राह्मण क शूद्र यांत ज्या पोटजाती आहेत त्यांत जातीच्या बाहेरच्यांशी विवाह साधारणतः करीत ७. निर्णयसिंधु, ३रा परिच्छेद, कळिवर्ण्य प्रकरण, “बृहन्नारदीये समुद्रयातुःस्वीकारः कमण्डलु- विधारणम् । द्विनानामसवर्णासुकन्यासूपयंमस्तथा ॥. " अर्थ: समुद्रांतून जाणान्याचा स्वीकार, कमण्ड लूचें सर्व-काल धारण करणें, असवर्ण कन्यांशीं द्विजांचा विवाह, हीं कलियुगांत वर्ज्य आहेत. 66