पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यवहाराध्याय. ४१ ३७ हिश्शाइतकी रक्कम दरमहा व्याज ह्मणून घ्यावी. तारण दिलेले नसल्यास [ ऋणको- च्या ] वर्णानुक्रमाप्रमाणे, दोन, तीन, चार, किंवा पांच [ या भावानें दर शेंकडा व्याज घ्यावें . ] रानांत फिरणारा जर [ऋणको] असेल तर त्यानें दर शेकडा दहा, व जलमार्गानें सफर करणारा असल्यास त्यानें दर शेकडा वीस व्याज द्यावें. किंवा सर्व वर्णांनी आपआपल्या [ कोणत्याही वर्णाच्या ] धनकोस जसें कबूल केलेलें असेल त्याप्रमाणें व्याज द्यावें. ३८ [ आपल्या ऋणकोकडून आपल्या कर्जाची ] अत्यंत मोठी [ वाढीदिदी कोणी धनको कायदेशीर रीतीनें घेऊं शकेल ती अशीः ] पशु जातीची मादी असल्यास तिची प्रजा, तैलघृतादि प्रवाही पदार्थांचे संबंधाने आठपट, कापडाची चौपट, धान्याची तिप्पट, ज सोन्याची दुप्पट. ३९ जो धनको कबूल केलेले कर्ज वसूल करील त्यास राजाकडून दोष मिळणार नाहीं, कबूल केलें असूनही जर ऋणकोने राजाकडे फिर्याद केली, तर ऋणकोकडून कर्ज देववून शिवाय दंड घ्यावा. पण ४० ऋणकोनें ज्या क्रमानें कर्ज घेतलें असेल त्याच क्रमानें [ धनको समवर्णाचे अस- तील तेव्हां ] त्याजकडून कर्जाची फेड करवावी; परंतु ब्राह्मणाचे कर्ज प्रथम, दुसऱ्यानें क्षत्रियाचें व नंतर इतर वर्णांचें. ४१ ऋणकोवर जेवढ्या रकमेबद्दल हुकुमनामा होईल त्या रकमेवर त्याजकडून शेंकडा दहा व ज्याचे वतीनें हुकुमनामा होईल त्या धनकोकडून शेंकडा पांच राजानें घ्यावे. ४२ नीच वर्णांतील ऋणको असून त्यास कर्ज फेडण्याचे सामर्थ्य न राहील, तर त्यास कर्जाचे फेडोबंदल [ धनकोचे ] घरी चाकरी करावयास लावावें; परंतु ब्राह्मण ऋणको सामर्थ्य नसल्यास त्याचे सोईसोईनें हळू हळू त्याजकडून कर्ज देववावें. ४३ व्याजाकरितां ठेवलेली रक्कम परत देत असतां धनकोनें न घेतल्यास, व ती तिन्हा- इताचे हातीं [ ऋणकोनें[ अमानत देऊन ठेविली असेल तर, अमानत ठेवल्या दिवसापा- सून त्या रकमेवर व्याज चढणार नाहीं. ४४ अविभक्तकुंटुंबांतील मनुष्यांनी कुटुंबांतील माणसांसाठी कर्ज काढलेले असून, कुटुं- बांतील मुख्य पुरुष मयत होईल किंवा दूर देशांतरी जाईल, तर तें कर्ज त्याचे वारसांनी द्यावे. ४५ कुटुंबासाठी काढलेले नसल्यास, नवयाचे किंवा पुत्राचे कर्ज स्त्रीने दिले पाहिजे असें नाहीं; तसेंच पुत्राचें बापानें, किंवा नवऱ्याने पत्नीचें. ४६