पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

`व्यवहाराध्याय. ६३ गांठ येत नाहीं व फांद्या फुटत नाहींत ), ओषधि ( ज्यांची फळें पक्क होतांच ) त्यांचे आ- युष्य संपते, जसें साळी ), आणि वीरुध ( कापलें तरी पुनः वाढणारें ), यांस वर सांगित- लेल्या प्रकारची इजा केल्यास पूर्वी सांगितलेले दंडाचे निम्मे दंड. साहस ( मोठे अपराध. ) २२९ कोणतीही मालमत्ता ( सर्व साधारण किंवा एका व्यक्तीची) जबरदस्तीनें घेऊन जाणें या कृत्यास साहस ( मोठे अपराध) असें ह्मणतात. [ अशा अपराधांस सामान्यतः ] दंड [ नेमलेले मालाचे ] किंमतीचे दुप्पट [ सांगितला ] आहे. [परंतु अपराध ] नाकबूल केल्यास चौपट दंड. २३० कोणी मनुष्यानें दुसऱ्याकडून साहस अपराध करविल्यास [ त्याबद्दल त्यास ] दुप्पट दंड; आणि “ अमुक॰ [ इनाम ] मी तुला देईन " असें ह्मणून तेंच जो त्याजकडून चौपट दंड देवविला पाहिजे. करवील २३१ पूज्य पुरुषास जो शिवीगाळ करील किंवा त्याची अमर्यादा करील, जो आपले भावजयीस ताडण करील, देऊं केलेलें जो देणार नाहीं, कुलूप तोडून जो घर उवडील, २३२ अथवा आपल्या शेजाऱ्यास किंवा आपल्या कुळांतील मनुष्यांस वगैरे जो इजा करील, त्यास दंड पन्नास पण. २३३ स्वच्छंदपणानें जो विधवेशीं संग करील, ऐकूनही जो [ मदतीस ] जाणार नाहीं, जो नसतां ] मारील, जातीचा चंडाळ असून उच्च वर्णास जो स्पर्श करील, ' धांवा धांवा ' अशी आरोळी मारलेली 'धांवा धांवा ' अशा आरोळ्या [ कारण २३४ शूद्र संन्याशांस जर कोणी धर्मकार्याचे किंवा श्राद्धादिकार्याचे [ प्रसंगीं ] भोजन घालतो, अयोग्य शिवी देतो, [ जरी ] तसें करण्याचा अधिकार नाहीं तरी जो शास्त्रोक्त धर्मकृत्ये करतो, २३९ बैल किंवा दुसरे लहान चतुष्पाद पशूंचे पुरुषत्वाचा नाश करतो, सार्वजनिक माल- मत्ता जो छपवून ठेवतो, जो दासीचे गर्भाचा नाश करतो, २३६ अथवा पिता आणि पुत्र, बहीण आणि भाऊ, पति आणि पत्नी, व गुरू आणि शिष्य, अशासंबंधाचे असतां, पतितत्त्वाचे कारणावांचून, एकमेकांस जे सोडतात त्यांस, शंभर पण दंड केला पाहिजे. २३७ लोकांची वस्त्रे [ धुण्यास आणलेलीं ] धोब्यानें वापरल्यास त्याला तीन पण दंड केला पाहिजे; परंतु कपडे विकल्यास, भाड्याने दिल्यास, गहाण ठेवल्यास, किंवा [ वा- परण्यासाठी ] उसने दिल्यास दंड दहा पण. २३८