पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७६ • व्यवहारमयूख. बृहस्पतिवचन आहे तेंही आपल्या वधास उद्युक्त अशा आततार्यांवांचून इतर प्रकारचे आततायांस जो न मारणारा त्यास लागू आहे असें समजावें ( ह्मणजे आपणास ठार कर- ण्याचे इराद्यानें जो कोणी चाल करून येईल त्यात ठार मारावेंत्र, त्याचा प्राण राखून पु- ण्य नाहींच ; पण तशा प्रकारचा आततायी शिवाय करून इतर प्रकारचे आततायींचा वध करण्याचा प्रसंग असतां, वध न करणे पुण्यकारक अशा अर्थी समजावयाचें ). शिवाय “ब्राह्मणांत श्रेष्ठ अशा आततायी ब्राह्मणाचा वध धर्मयुद्धांतही ( न्यायानें केलेले युद्धांतही) करूं नये १६६४ या वचनानें ब्राह्मण दुसऱ्याचे ववास उद्युक्त झाला असतांही त्याचा वध कलियुगांत करूं नये असा ब्राह्मणवधाचा निषेध केला आहे, तेव्हां जर ब्राह्मणवध शास्त्राज्ञ- नैं प्राप्त झालेला नसता, तर कलियुगांत, तो निषेध ( ब्राह्मणवध करूं नये हा निषेध ) व्यर्थ झाला असता. शिवाय धर्मशास्त्रावरील सर्व ग्रंथांत असे स्पष्टपणे सांगितलेले आहे कीं, कलियुगांत जे निषेध सांगितलेले आहेत ते सर्व [ पूर्वीच्या ] शास्त्रानुसार प्राप्त झालेले धर्मास ( शास्त्रोक्त कृत्यांस ) उद्देशून आहेत व ह्मणूनच ज्ञात्या पुरुषांनी “ कलियुगांत हे धर्म वर्ज करावयाचे ह्मणून सांगितलेले आहेत. ”६६५ या वचनांतील धर्मपदास यथायो- ग्य स्वारस्य येतें. या कारणास्तव या कलियुगांत, इतराचा प्राणघात करण्यास उद्युक्त झालेले आततायी ब्राह्मणाचा वध [ ज्याचा प्राणघात करण्याचा उद्देश होता त्या माणसा- ] करावयाचा नाहीं. इतर युगांत तो वास पात्र होता. दुसऱ्याचा वध कर- ण्यास उद्युक्त न झालेल्या आततायी ब्राह्मणाचा वध कोणत्याही युगांत नाहीच, परंतु क्षत्रियादिक सर्व वर्गांचे आततायी पुरुष सर्व युगांत वधास पात्रच आहेत. याप्रमाणें या विषयाचे दिग्दर्शन झालें. ही धातु, मध्यम आणि मूल्यवान् धातूंच्या वस्तू चोरल्यास त्याबदल शिक्षा बृहस्पति सांगतो " शेतकीची हत्यारें, फुलें, मुळें, किंवा फळे, हीं कोणी चोरून ने- ईल, किंवा तोडून पाडून टाकील, तर त्यास शंभर पण किंवा अपराधाच्या अनुरोधानें अधिक दंड करावा. त्याचप्रमाणे ( लहानसहान ) जनावरें, वस्त्रें, अन्ने, पिण्याचे पदार्थ, आणि घरांतील वस्तु हीं जो कोणी नाश करील किंवा चोरून नेईल, त्यास दोन पणांपेक्षां कमी दंडाची शिक्षा करूं नये. स्त्रिया, पुरुष, गाई, सोने, हिरे, माणके, व देवाची किंवा ब्राह्मणाची किंवा स्त्रियांची जिनगी, यांसंबंधानें किंवा इतर कोणत्या - ६६४ हें वचन हेमाद्रौ आदित्यपुराणे यांतील आहे, असें निर्णयसिंधु ग्रंथांत सांगितलेले आहे, (तृतीय परिच्छेद, पुर्वार्द्ध प० ६२ पृ० २ ). ६६५ धर्माब्धिसार, तृतीय परिच्छेद, पूर्वार्द्ध प० ११९ पृ० १, दें वचन बृहन्नारदीय झणून निर्णय- सिंधु ग्रंथांत सांगितलेलें आहे. (तृतीय परिच्छेद, पूर्वार्द्ध, प० ६२ पृ० २ )