पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६४३

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

________________

दत्तकदर्पणाचा सारांश. 4 ३२७ गति अशी: -- यमवचनांत होमाची अनावश्यकता सांगितली ती भ्रातृपुत्रादिकांच्या ठायीं वाग्दानमात्राही दत्तकत्वसिद्धि होते हैं बोधन करण्याकरितां आहे, सर्वथा होमनिवृत्ति- करितां नाहीं. होमविधि विभक्तस्थलामध्ये पत्नी, कन्या, दौहित्र हे विद्यमान असले तरी पित्याचे धनाचें ग्रहण दत्तकच करील हैं दृढ करण्याकरितां आहे. ह्मणून असगोत्र असपिंड तर सापिंड्यसगोत्रोत्पादक होमादि विधीनेच घ्यावा. स्त्रियांनीही पुत्रग्रहण करावें. कोणी अज्ञ शंका करितात कीं, ' न स्त्री पुत्रं ' इत्यादि वसिष्ठवाक्या- वरून स्त्रियांस पुत्रदानप्रतिग्रहाचा अधिकार नाहीं. त्यांस हें विचारावें कीं, स्त्रियांस होमप्रतिग्रहमंत्राचा अधिकार नसल्यामुळे हा अधिकार नाहीं, असें जर तर तें नाहीं, कारण स्त्रीने संकल्पमात्र करून आचार्यद्वारा होमादि करविण्यास कांहीं - बाघ नाहीं. जवळचा सपिंड सगोत्र घेतला तर होमाचीही जरूर नाहीं. वाग्दानानें सिद्ध होतें तें सांगितलेच आहे. आणि स्त्रियांस सर्व वेदाध्ययनाचा जरी अधि- कार नसला, तरी इष्टींत ' सुप्रजसस्स्वा ' इत्यादि मंत्रासारख्या यावदुपयुक्त मंत्राचा येथेंही अधिकार सिद्ध होतो. 'भर्त्रनुज्ञा नसेल तर अधिकार नाहीं हेंही ह्मण बरोबर नाहीं, कारण ' अन्यत्रानुज्ञानात् ' या वसिष्ठवाक्यांत भर्त्याची अनुज्ञा नसल्यास स्त्रियांस निषेध सांगितला तो मंत्राचा अधिकार नाहीं ह्मणून नाहीं तर भवनुज्ञेची अवश्यकताबोधनार्थ आहे. आतां ती भर्त्रनुज्ञा सुवासिनीला की विधवेला ? सुवासिनीला • मानिली तर तिला पूर्वोक्तमंत्रासारखा प्रतिग्रहमंत्राधिकार आहे; आणि भर्ता जवळ असेल तर तो आपणच पुत्रग्रहण करील, स्त्रीला आज्ञा किमर्थ देईल ? कदाचित् दुर्दैवानें . वा मनुष्यापराधानें जेथें अपुत्रपतीनें पुत्रप्रतिनिधि केला नाहीं, तूं पुत्र घे असें पत्नीस . सांगून आपण मृत होईल, तेव्हां पिंडाद्यर्थ पुत्र पश्चात् विधवेनेच केला जाईल. आतां वसिष्ठवचनांत भज्ञा अविशेषात् विधवेला प्राप्त होते अशी शंका येते. त्यांत ‘असा विचार आहे कीं, जेथें दोन पत्नींत एक अपुत्रा असेल तेथे असूयेनें कदा- चित् ती ' सर्वासामेकपत्नीनां' या वचनाचा अनादरं करूनही भर्त्रनुज्ञा घेऊन पुत्रग्रहण करील; तें सधवेला अनुज्ञा घेण्याचें स्थल ह्मणावें तर तेंही संभवत नाहीं, कारण मन्वादिवचनाचा अनादर करण्यास प्रमाण नाहीं. पतीला तर दुसरे पत्नीसँ पुत्र आहे. ह्मणून अधिकार नाहीं. ( १ ) तस्मात् भर्त्रनुज्ञा नसल्यानें जो अनधिकार तो सघवे- लाच आहे. विधवेला त्याची जरूर नाहीं. स्त्रियांस अविशेषानें दानप्रतिग्रहाचा अ- धिकार आहे. 'पिता रक्षति' इत्यादि वचनावरून भर्तृपारतंत्र्य सधवांसच आहे; विध- वांस त्याची जरूर नाहीं. विधवेनेंही पुत्रस्वीकार विभक्तस्थलांत करावा, 'पत्नीदुहितरः' इत्यादिक अनेक वचनें परस्परविरुद्ध आहेत. त्यांची व्यवस्था कोणताही पुत्र नसेल व विभक्त दशा असेल तेव्हां पत्नी धनहारिणी. अविभक्तदर्शेत भ्रात्रादिक कारण