पान:ही अंतःकाळाची मिरवणूक अधिक प्रिय - दामोदर हरी चापेकर.pdf/२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आलाच नव्हता. उगाच गप्पा लोकांत पिकत की तो आला आणि कामावर रुजू जाहला. पण पुष्कळ दिवसानी तो कामावर रुजू जाहला असे आमचे मत आहे. त्यादिवशी ही मूर्ति आम्हास स्पष्टपणे पहाण्यास मिळाली तरी आम्ही तोच रॉडसाहेब आहे अशाविषयी बहुमुखानी खात्री करून घेतले. नंतर त्याची गाडी पाहिली आणि मग गाडीवाल्यास भिस्कुटयाकडून विचारिले की, रॉडसाहेब कोठे रहातात. तेव्हा कळले की, ऍडसाहेब क्लबमध्ये रहातात. मग आम्ही क्लबमध्ये बाहेर खेपा घालू लागलो. पण पत्ता लागेना. मग लष्करमध्ये जाणे सोडून आम्ही गाडीचे मागून तपासणीवरच जाऊ लागले. त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ तो आम्हास पहाण्यास मिळे. तपासणी सुरू झाल्यापासून तो रोज सकाळ बुधवारात येऊन नंतर ज्याठिकाणी तपासणी असेल त्याठिकाणी जात असे. बुधवारात येई त्यावेळेस त्याला पाहण्यास पुष्कळ लोकांची गर्दी होत असे. प्रथम दिवशीच तपासणी जाहली ती बुधवारात जाहली. त्यावेळेस जो देखावा दृष्टीस पडला तो अपूर्व होता. लोकांस या तपासणीचा प्रकार माहीत नसल्यामुळे ते बेसावध होते. त्यांना जर ठाऊक असते की, ही तपासणी म्हणजे जीवनकूट आणि तपासणी करणारे गोरे हे बंडखोर आणि त्यांचे नाईक कर्नल फिलिप्स लुई गोरे होते रॉडसाहेब या बंडखोरीवर हुकूम फर्माविणारे मुख्य आहेत. ही बुलेट इंग्रजांचे मनांत चरायची म्हणून पूर्वी जॉन म्हणून एक डाकू नेमून त्याच्याकडून सर्व । लहानथोर गोरगरिबांच्या घरास मोठमोठी भगदाडे पाडली. याचे कारण इतकेच की, पुढे आपणास दिवसाढवळया दरोडा घालण्यास यायचे आहे. त्यावेळस त्यात असलेल्या तिजोरीच्या पेट्या किंवा चीजवस्तु दिसावी म्हणून काही इंग्रज बंडखोरांनी ही अगोदर तजवीज करून ठेविली. जॉनसाहेबांनी प्रथम साधारण तपासणी करून गरीब कोण श्रीमंत कोण याची बारीक तपासणी केली. नंतर त्याची नोंद बंडखोरांना प्रथम दिली असती.

रयतेवर जूलुम

आमच्याइकडे दरोडेखोर प्रथम बारीक तपासून मग रात्री दरोडा घालतात. तोच प्रकार कायदयाच्या ढोंगाखाली हिंदु लोक गरीब पाहून इंग्रज बंडखोरांनी चालविला. हे मायबाप सरकार आपल्या रयतेचे गळे अशा रितीने कापत असे. जर प्रथम लोकास कळले असते तर कोठेतरी जीव लपविण्यास चीज वस्तु सोडून गेले असते. पण त्याचा हा प्रकार ध्यानात न येऊन ते आपल्या घरी पडले होते. इतक्यात पहिल्या दिवशी या बंडखोरांची टोळी बुधवारात आली. बरोबर नाकेबंदी करून कुलुपे तोडून दुकाने फोडण्यास आरंभ झाला. असा होता तो देखावा. खरोखरीच असा प्रकार राजाकडून प्रजेवर झालेला कधी कोणीही इतिहासात वाचला नसेल की ऐकिला नसेल, परशङ्करिता तयार ठेवलेल्या