पान:ही अंतःकाळाची मिरवणूक अधिक प्रिय - दामोदर हरी चापेकर.pdf/४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोठे जागा आढळेना. मग आम्ही हे काम कमिटीच्या ऑफिसापाशीच करावयाचे ठरविले. एवढीच अट होती की, संध्याकाळचे आठ तरी निदान वाजले पाहिजेत. गावातल्या रिकामटेकडया लोकांनी ऍडसाहेबास निनावी धमकीची पत्रे पाठवून त्यास सावध केला होता. तेणेकरून आम्हास फार त्रास झाला होता. रात्र तरश करीना जाता येता बरोबर स्वार ठेवू लागला. तरी आम्ही आपली हिमत किचितही कमी होऊन दिली नाही. आम्ही दोघांना ठार करण्याचा निश्चय केला. तलवारी घेऊन आम्हास रात्रीशिवाय निघता येईना आणि तो कांही रात्र करीना, असे किती दिवस जाहले. गावात जुलुम आणि तापाची साथ वाढली. सर्व शहर उजाड झाले. आमच्या वडिलास लांब लांबहून बोलावणी आली की, तिकडे तापाची साथ वाढली आहे तर आपण इकडे यावेवडीलही जाण्यास तयार जाहले. पण आम्हास हे काम कर्तव्य असलेमुळे दूरदेशी जाणे आम्हास पसंत पडेना. म्हणून आम्ही वडिलांच्या जाण्यास हरकत घेऊ लागलो. पुणे सोडावयाचा त्यांचा अगदी आग्रह दिसला, तेव्हा आम्ही ठरविले की, दूर जाण्यापेक्षा जवळ आपले घरी चिचवडला जाणे सोईस्कर होईल. चिचवड हे पुण्यापासून पाच कोसावर आहे. आम्ही विचार केला की, जर चिचवडास गेलो तर रोज तेथे येऊन काम करून जाऊ असा विचार करून आम्ही चिचवडचा सल्ला दिला आणि तो वडिलांना पसंतही पडला. म्हणून त्यांनी चिंचवडास आमचे चुलत्यांना पत्र पाठविले. पण त्यांनी अनेक हरकती लिहून चिचवडास येणे चांगले नाही असा आपला अभिप्राय कळविला. अशा रितीने आपले बंधुप्रेम व्यक्त केले तेव्हा जवळ आसपास दुसरी जागा आढळेना. अखेर आम्ही प्रयत्न करून आमचे व्याही परसावे यांची बाग खडकीस आहेती त्यांना विनंती करून मिळविली. ती आम्हाला चिचवडपेक्षा सोईस्कर वाटली आणि त्या ठिकाणी आम्ही सुमुहूर्त पाहून गेलो. आम्ही तिघे या भयंकर कृत्याच्या पाठी लागलो असा संशयसुद्धा कोणास उपजू नये याबद्दल आम्ही फार सावधगिरी ठेवित होतो. खडकीच्या बागेत असताना त्या ठिकाणी आणि एक आरनोन्रस नावाचा मिशनरी खडकी बाजारात राहतो. त्याची आमची आळख, त्याच्यापासून आम्ही पंचवीस तीस केप मागून घेतले. पण दारू कोठे मिळेना, पण इतक्यांत कोथरूडचे बागेत कचरे म्हणून माळी आहे त्याच्या इथे दारू सापडण्याचा संभव आहे असे सांगितल्यावरून आम्ही तिघे एक रात्री मजेखातर म्हणून गेलो आणि दारू छरे

रॉडसाहेबाच्या जुलुमाची पराकाष्ठा व लोकांत असंतोष

रॉडसाहेबाचे जुलुमाची पराकाष्ठा झाली. सर्वतोमुखी रॉडसाहेबास मारावयाच्या गोष्टी ऐकू येऊ लागल्या. सर्व लोक आपल्यात कोणी स्वधर्मा