पान:ही अंतःकाळाची मिरवणूक अधिक प्रिय - दामोदर हरी चापेकर.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उडलेली दशा पाहून आम्ही जगाबद्दल फारच निराश झालो. असे वाटे की, परमेश्वर आम्हास सुद्धा असेच एखादे दिवशी उचलून नेणार करिता जे होईल ते होवो. आता रात्रीची संधि न सांपडली तर दिवसा काम करावयाचा पण सोडावयाचा नाही असा विचार करून भिस्कुटे गेले म्हणून आम्ही किंचितही विचार कमी न करता आमचा उदयोग उलट जारीने चालविला.

रेंडसाहेबास मारण्याचा बेत

होता होईल तो आपला बचाव करून काम करावयाचे, न सापडल्यास एकाची आहुती झाली तरी हरकत नाही. बंडखोराची टोळी ज्या वाटेस आमच्यापर्यंत येई त्यावाटेस आम्ही सज्ज होऊन बसत होतो. कारण न जाणो या गोच्या तोंडानी जर अमर्याद वर्तणूक आपले घरी केली तर एकच प्रायश्चित दयावयाचे असा आमचा निश्चय होता. या हलक्या सोजरास मारण्याला भूल नाही. करिता अशा वेळी रेंडसाहेब मिटला पाहिजे. करिता आम्हापैकी एक भाऊ ऍडसाहेब कुठे उभा आहे हेही पाहून ठेवित होता. कदाचित घरांत कमी जास्त वर्तणूक यांनी दाखविली की, त्याला मी टहलकावे आणि बंधूनी रॉडसाहेबास, अशा तयारीने प्रत्यही तयार रहात होतो. पण सुदैवाची गोष्ट की, आमच्या घरी ते आमच्या सांगण्याबाहेर वागत नव्हते. कधीकाळी असेही झाले की आमचा भाऊ अलाडी होता. त्यावर हे बंडखोर आले त्यावेळी आम्ही अगदी सशस्त्र होऊन तयार होतो. मी या शहरात कोणी स्वाभिमानी आहेहे या बंडखोरास दाखवावयाचे अशा बेताने होतो. आम्ही आपल्या घरी या बंडखोरासाठी खुबीने वडिलांचे माडीवर आणि बंधूच्या खोलीत मात्र मोडून जात होतो. बाकीच्या भागांत देवघरस्वैयंपाकघर, बायकांचे घरइतक्या ठिकाणी आम्ही या नरपशूना जाऊ देत नव्हतो. आणि आमच्या घरापाठीमागील बाजूस आमची म्हैस बांधली आह, ता या गाया तोंडास पाहून मारायला धाव. तिचा भयाण मुद्रा पाहून हे गोरे पाठीमागच्या बाजूस जात नसत. अशी आमच्या घरी म्हैस मुर्धा होती याबद्दल आम्हाला फार अभिमान वाटे. अशा रितीने आम्ही तयार असल्यामुळे ईश्वरास काळजी वहावी लागत असे. आमच्या घरी ते आमच्या सांगण्याप्रमाणे वागत असत. नाही म्हणण्यास एके दिवशी एक गोरा म्हणाला की, तुमच्या घरात मला गेले पाहिजे. तेव्हा आम्ही उभयतानी सक्रोध मुखाने सांगितले की, जाणे होणार नाही. तेव्हा काय त्याला ईश्वराने बुधी दिली तो जास्त प्रकार न करिता निघून गेला. बाहेर मात्र जुलूम जाहलेले मी पाहिले. आपण पण आमच्या घरी कांही एक चीड होण्यासारखा प्रकार न झाल्यामुळे आम्ही सावकाशपणे या ऍडचे काम करीत होतो. साधारण तक्रारी आमच्या त्या गोव्या सोजराबरोबर पुष्कळदा जाहल्या पण त्या रस्त्यावर आम्हीहून काढलेल्या कुरपतीवरून झाल्या.