पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/202

हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुरुंगात गेली म्हणजे त्या प्रत्येक माणसामागे सहानुभूती असणारी पाच-सात तरी माणसे असतात. आणि त्यांची बायकामुले व नातेवाईक धरले तर दहा टक्के लोक तुमच्या मागे आहेत अशी खात्री असते. यश शेवटच्या आंदोलनात येत असते. पहिली आंदोलने अपयशीच असतात. तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर ही वेळ आता आंदोलन मागे घेण्याची आहे. आपली ताकद आपण दाखविलेली आहे, पण संपू दिलेली नाही. कार्यकर्ते निराश होण्याच्या आत आपण त्यांना सोडवून आणणार आहोत. तेच पुढच्या वेळी नेते, कार्यकर्ते बनणार आहेत. अशी गांधींनी गोविंदभाईंची समजूत घातल्याचे, त्यांनी मला समजावून दिले.

 गांधींचे हे मार्गदर्शन बरोबर होते. ते जे म्हणाले तसेच झाले. तुरुंगात गेलेली माणसे सहा-सात महिन्यांत सुटली. त्यांतील काही वकील झाले. काही शिक्षक झाले व उरलेले पूर्ण वेळचे राजकीय नेते झाले. अशा रीतीने आमची पहिली संघटना तयार झाली. यानंतर गोविंदराव नानल लौकरच वारले. स्वामी रामानंद तीर्थांचा दीर्घ पत्रव्यवहार निजामाच्या पंतप्रधानाशी चालू झाला, की संस्थानी काँग्रेसवरची बंदी उठावी. हैदरी त्या वेळेस हैदराबादचे पंतप्रधान होते. हैदरींचे म्हणणे असे की संस्थानी काँग्रेसमुळे हैदराबादेत जातीयवादाचा तणाव वाढतो. हिंदु-मुसलमानांचे दंगे होतात. ऐक्याचा भंग होतो. हिंदु-मुसलमान ऐक्य ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसला परवानगी देता येत नाही.

 याच सरकारने इत्तेहादुल मुसलमीन या संस्थेला मात्र परवानगी दिली होती. त्या संस्थेमुळे हिंदु-मुसलमानांचे ऐक्य भंगण्याची भीती सरकारला वाटत नव्हती. या परिस्थितीत जर संस्थानी काँग्रेस म्हणून काम करता येत नसेल तर आपण काय करावयाचे? जुनी महाराष्ट्र परिषद आहे ती पुनर्जीवित करा. काम तिच्याद्वारे करा. एक पथ्य सांभाळावयाचे. मुद्दा एक राजकीय भूमिका घ्यावयाची नाही. पहिले अधिवेशन परतुडला झाले. दुसरे अधिवेशन उमरीला झाले. या अधिवेशनात राजकीय प्रश्न सोडून इतर प्रश्नांची चर्चा सरू झाली. शिक्षण मातभाषेतून पाहिजे. त्याचा विकास असा व्हायला पाहिजे. नोकरीचे नियम असे असायला हवेत. शेतीचे कायदे तसे असायला हवेत. इत्यादी.

 या उमरीच्या अधिवेशनात एक गोष्ट लक्षात आली की, संस्थानी काँग्रेसने जे तरुण तयार केलेले आहेत त्या सर्वांमध्ये गोविंदभाई श्रॉफ यांचे बौद्धिक वजन फारच

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२०४