या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार ११६
उदकाप्रमाणे किंवा आरशाप्रमाणे मनाचे दर्पण पुढे मांडिलें आहे, आणि त्यांत प्रतिबिंबित झालेल्या विचारांचे व कल्पनांचे हुबेहुब स्वरूप अवलोकन करीत आहे; अशा स्थितीत एखाद्या आगंतुक विचाराचे प्रतिबिंब त्या दर्पणांत पडू देऊन त्याच्या रूपाची व आकाराची इतरांच्या रूपाशीं व आकाराशीं तुलना करण्यास त्याला भीति कशासाठीं वाटावी ? अभ्यासाच्या खोलीचे दार लावून घेऊन मनाच्या कपाटाचीं दारें खुलीं टाकण्यास व त्यांतून पाहिजे त्या विचारांस बाहेर पडू देण्यास व पाहिजे त्यांस अांत शिरू देण्यास ज्याची छाती होत नाहीं, तो मनुष्य कुचक्या कसपटापेक्षांही नादान होय असें म्हणण्यास हरकत नाहीं. पण असलेच मनुष्य जगाच्या सांप्रत स्थितीत जेथें तेथें फार आढळतात; निदान हिंदुस्थानांत तरी ते असावे त्थापेक्षां फार फाजील आहेत; आणि हा फाजीलपणाच आमच्या चिरकालीन दैन्यावस्थेस आद्य कारण झाला आहे. स्वतंत्रपणे विचार करतां करतां तो बोलून दाखविण्याचे धैर्य येतें, व बोलतां बोलतां क्रिया करण्याचीही इच्छा उत्पन्न होते.{मनाच्या देवडींतून जी कल्पना जोरानें निसटते ती वाचेच्या किंवा कायेच्या देवडीवरील रखवालदारांस फारशी डगणारी नसते ! मेंनेोंतल्था मनांत पाहिजे त्या विषयाविषयीं हवा तसला विचार करण्यास कशाचीही भीति नसतां, पुष्कळांचीं मनें तसें करण्यास कां कचरतात कोण जाणे. बेहुधा त्यांना अशी दहशत वाटत असेल कीं जे विचार लोकमतानें अलाव्य किंवा त्याज्य मानले आहेत त्यांना आपण आपल्या मनांत आश्रय दिला तर कदाचित् आपल्या मनांतील चांगल्या विचारांस ते हुसकून लावून त्यांची जागा बळकावतील; आणि या आगंतुकांचे एकदां का वर्चस्व झाले म्हणजे आपल्या तोंडावाटे ते बाहेर पडू लागतील, आणि न जाणों आपल्या आचरणावरही त्यांचा परिणाम होऊं लागून त्याबद्दल लोक आपणांस दूषण देऊं लागतील. नवीन विचाराविषयीं, मनुष्यांच्या मनांत जी दुर्मुखता दृष्टीस पडते तिचे खरें कारण हेंच असेल, व त्यामुळे इतके लोक विचाराच्या कुमीं गुतानुगतिक होत असतील तर आज आम्हांस जी स्थिति प्राप्त झाली क्षेोहे, तॆी अगदीं स्वाभाविकपणे प्राप्त झाली आहे, असें म्हटल्यावांचून गेल्यंतर नाहीं; कारण या देशांत अशाच लोकांचा भरणा फार आहे; व ह्या प्रमाण असेंच राहणार असेल तर या देशाचे डोकें वर निघण्याची