या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १४२
काय म्हणणे आहे, हें पहात न बसतां, त्या बेलाशक करून टाकल्या ! यावरून असें दिसतें कीं, आमच्या तोंडांत मारणारा जबरदस्त इसम आम्हांला भेटला कीं, आम्ही आपला गाल निमूटपणे त्याच्यापुढे करतों ! पण जर तोच इसम केवळ आमच्या कल्याणाकरितां अमुक गोष्ट करूं की नको, असे आम्हांस विचारील तर आम्ही आपल्या अधिकाराचा तोरा मिरावेल्या- शिवाय कधींही रहावयाचे नाहीं ! भेकड व प्रतिष्ठाखोर हिंदु लोकांनो, ज्या वेळेस पोर्तुगीज लोकांनी ख्रिस्ती धर्मस्थापनेसाठी कोकणपट्टीत तुमचे अन न्वित हाल केले, त्या वेळेस तुमचा धर्माभिमान कोठे गेला होता ? विषय- लंपट निःशक्त वाचाळ बाबूंनो, जेव्हां महंमदीयांनी हिंदुस्थानच्या एका टोंकापासून दुसऱ्या टोकापर्यंत साऱ्या हिंदु लोकांस आपल्या धर्मवेडानें जर्जर करून सोडलें व तुम्हां हिंदूंच्या मानांवर असिधारा ठेवून, तुम्हांकडून तुमच्या शेंड्या काढविल्या आणि तुम्हांस गोमांस चारिलें, तेव्हां तुमच्या धर्मरक्षणासाठी आतांप्रमाणे तुम्ही नुसता आरडा तरी करावयाचा होता ! त्या मुसलमानांच्या भीतीनें अजून तुम्ही आपल्या बायका कुलपांत घालून ठेवल्या आहेत, हें तुम्हांस कळत नाहीं काय ? आणि आतां दयावंत ब्रिटिश सरकार केवळ परोपकारबुद्धीनें आपल्या लहान पोरींवर जुलूम करूं नका, येवढें अदबीनें सांगत असतां त्यावर तुम्ही आपले धर्मास्त्र सोडतां, आणि कामाच्या झपाट्यांत निराश्रित कुमारिकांची अंगें विदारण्याचा हक्क आमच्या धर्मात आम्हांस दिला आहे व सरकार तो काढून घेण्याचा प्रयत्न करील तू त्याला आमच्या असंतोषाचें फळ भोगावें लागणार, अशी धमकी बालता विकार असो तुम्हांला, तुमच्या धर्माला, आणि तुमच्या हकाला ! ! !

XXX
८. म्हणे जात कां करीत नाहीं ?


 जातकां करीत नाहीं ? ' असा प्रश्न करणारे आपण काय बरळतों याचा क्षणभर तरी विचार करतात काय ? जात करणें म्हणजे कां चिखलाचें पार्थिव करून दोन घटकांनीं फेंकून देणे, कीं नदीला गढूळ पाणी आलें असतां, तिच्या कांठावर वाळूत झरा उकरणें, का उन्हाळ्यासाठी घरापुढलें अंगण खणून सारवून स्वच्छ करणें, का चार दिवसांच्या उत्सवासाठीं