या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४३ विविध विचार

लव्हाळ्यानें आच्छादिलेला मंडप घालणें-कीं आहे तरी काय ? म्हणे * जात करा ? ! आजपर्यंत काय थोड्या जाती झाल्या आहेत ? परब्रह्म आणि माया या पहिल्या दोन जाती ! पुढे हिंदुस्थान वसविण्यासाठीं ब्रह्मदेवाच्या मुखांतून, बाहूतून, ऊरूंतून व पायांतून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार जाती अवतरल्या ! या देवकृत चार जाती आम्हांस पुरेशा न होऊन आम्ही केवढा जातिपसारा करून ठेवला आहे हें या प्रश्नकारांस ठाऊक नाहीं काय ? जातींच्या अनेकपणापासून होणाच्या दुष्परिणामांची फळे आम्हीं प्रतिदिवशीं भोगीत असतां, हे आविचारी, स्वार्थसाधु किंवा भेकड लोक आम्हांस नवीन जात करावयास सांगतात, तेव्हां यांच्या शहाणपणाला काय म्हणावें ? अथवा तें यांच्या अंगीं आहे किंवा नाहीं याचाच संशय आहे ! जातीमुळे आपला देशाभिमान किती संकुचित झाला आहे; जातींमुळे ज्ञान, कला, शास्त्रे वगैरे जेथल्या तेथें कशी कोंडल्यासारखीं झाली आहेत; जातींमुळे धर्मविचारांत व आचारांत किती मतभेद उत्पन्न होऊन तो परस्पर वैरास, छळास व मत्सरास कारण झाला आहे; जातींमुळे अन्नव्यवहार, विवाह वगैरेंच्या संबंधानें किती गैरसोय झाली आहे; जातीमुळे देशांतल्या देशांत किंवा परदेशीं प्रवास करणें किती कठिण झाले आहे; जातीमुळे परद्वीपस्थ व परधर्मीय लोकांपासून अलग राहावें लागत असल्यामुळे केवढे नुकसान होत आहे; जातीमुळे आमची भूतदया, आमचे बंधुप्रेम, आमची उदारता, आमची धर्मबुद्धि, आमची परोपकाररति, आमचे विचार यांचे क्षेत्र किती मर्यादित झाले आहे, याची या * धीर ? सुधारकांच्या मनांत खरी कल्पना कधींच येत नाहीं काय ? किंवा ती येत असूनही ते आम्हांस आणखी एक नवीन जात काढण्यास सांगतात काय ? कदाचित् एके काळीं या इतक्या जाती कांहीं विशेष कारणामुळे अस्तित्वांत येणें अपरिहार्य होतें. पण येथून पुढे जो या देशांत नवीन जात काढण्याचा प्रयत्न करील तो त्याचा हितचिंतक न समजतां दुष्ट शत्रूच समजला पाहिजे. आज ज्या आम्ही अनेक विपत्ति भोगीत आहाँ त्यांपैकीं ज्यांचे जनन आमच्या जातिमेदापासून झालें नाहीं, असें म्हणतां येणार आहे, अशा फारच थोड्या असतील ! धर्मविषयक किंवा राज्यविषयक गोष्टींच्या संबंधानें मतभेद होऊन निरनिराळे पंथ किंवा पक्ष उपस्थित होणे हा प्रकार आमच्यांतील जाती