या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १५०
देशांतील सुधारणा कितीहि प्रबल झाली असली तरी तींत कांहीं हाशील नाहीं. सबब सर्व सदय, देशाभिमानी सुशिक्षित, आणि श्रीमंत लोकांना अपराधी मनुष्यतेचा कंटाळा न करितां ती सद्गुणी करण्यासाठी रात्रंदिवस सटलें पाहिजे

१३. मातृभाषा हेच शिक्षणाचे खरें माध्यम !

 देशांतील शिक्षणक्रम देशी भाषांत चालणे किती उचित आहे, हें ध्यानांत आणून तसे होण्याची खटपट करीत असणें हें तर एकीकडेच राहिले; पण बाकीच्या विषयांप्रमाणे देशी भाषांस युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमाचा एक विषयहि आम्हांस करतां येत नाहीं, यावरून आमची आस्था, धमक, निश्चित विचार, देशकल्याणाची खरी कल्पना आणि कोणत्याही गोष्टींत यश येई- पर्यंत तिचा पाठलाग न सोडण्याचा निर्धार ह्रीं व्यक्त होतात ! युनिव्हर्सिटी आपल्या अभ्यासक्रमांत देशी भाषांस घालत नाहीं ! युनिव्हर्सिटी अमकें करीत नाहीं ! युनिव्हर्सिटी तमकें करीत नाहीं ! असे रडगाणे आतां आम्ही किती दिवस गात बसणार? युनिव्हर्सिटी, सिंडिकेट, सेनेट, अभ्यासक्रम, शिक्षणालयें ह्रीं सारी निश्चयाने परिश्रम केल्यास आपल्या हात येणार आहेत, व आपणांस त्यांना पाहिजे तें वळण लाविता येणार आहे, हें तुम्हांस केव्हां कळू लागणार ? अगोदर देशी भाषांचा अभ्यास होऊं लाग- ण्यांत व पुढे त्या भाषांतच अभ्यास होऊं लागण्यांत या देशाचें खरें हित आहे अशी तुमची पक्की खात्री झाली असेल तर युनिव्हर्सिटीचे नाक धरून तिच्याकडून या अप्रिय औषधाचा स्वीकार करविणे अशक्य आहे काय ? ती मोठी सामर्थ्यवती आहे हैं आम्ही कबूल करतों. पण अशीला जेरीस आणण्याचा खरा उपाय तिच्यापुढे पदर पसरून ' यांत आम्हांस भिक्षा घाल ' अशी तिची 'दीनस्वरानें प्रार्थना करीत बसणें हा नव्हे. असें करूं लागलांत कीं, तिला अधिकच ताठा भरला म्हणून समजा. अभिमानाचा काटा अभिमानानेंच काढला पाहिजे. युनिव्हर्सिटीची सूत्रे सध्यां ज्यांचे हातीं आहेत त्यांना देशी भाषांचा किंवा देशी भाषांत वरिष्ठ प्रतीचा अभ्यास होऊं लागल्यानें पाश्चिमात्य ज्ञानभांडारावर हल्ला करणे, व त्या हल्लयांत