या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५९

भारतीय कलांचे पुराणत्व

आमचा इतिहास आनंदजनक किंवा उत्साहजनक नाही, इ प्रत्येक निःपक्ष- पाती हिंदूस कबूल केलें पाहिजे. पण यहुदी, मिसर, पारसीक किंवा मुसलमान या लोकांच्या इतिहासापेक्षां आमचा इतिहास कमी मनोहर किंवा उपयुक्त आहे, असें मानण्याची गरज नाहीं, असें दाखविणें कठिण पडणार नाहीं. महंमदीय लढवय्यांप्रमाणेंच धर्मवेडानें युरोप व आशिया खंडांतील मोठमोठाले देश आम्ही उध्वस्त केले नाहींत, व राज्यलोभानें लाखों लोकांचा प्राणसंहार करून आपली रुधिरभक्ति व क्रूर निष्ठुरता जगाच्या इतिहासांत अमर केली नाहीं ही गोष्ट खरी आहे. पण नीति, औदार्य, अनुकंपा, आप्तमित्रांचा परामर्ष वगैरे मानसिक गुणाचा, किंवा काव्य, चित्र, गायन, वादन इत्यादि ललित कलाचा; अथवा दुर्गरचना, गृहरचना, मूर्तिघटना पाषाणखनन इत्यादि शिल्पकलांचा येथे अभ्युदय होऊन त्यांची इतकी अभिवृद्धि झाली होती की त्यासंबंधाने आजमितीस सुद्धां आम्हांस कोणापुढेही खाली पाह- ण्याची आवश्यकता नाहीं. शिल्पकलेकडे वाफेच्या शक्तीचा उपयोग कर- ण्याची युक्ति सांपडल्यापासून, त्या कलेत प्रचंड क्रांति झाली आहे, व बाष्पप्रचोदित राक्षसी लोहयंत्रापुढे दीड फूट लांबीच्या हाडामांसाच्या हाताचें कांहीं एक चालेनासे झाले आहे, हें खरें आहे. पण यंत्रानें केवढंही अचाट कामें केलीं तरी यंत्रे हातांनींच करावी लागतात; व यंत्राना जी करामत करा- वयाची ती प्रथम हातानें साधण्यासारखी लागते. यंत्रांत नाना प्रकारच्या वेल- बुयांचे काम निघते; पण जर हातानें वेलबुट्ट्या काढतां येत नसल्या व नकाशे तयार करतां येत नसले तर वेलबुट्यांचे काम यंत्रावर काढतां येणार आहे काय ? ज्याप्रमाणे दुर्बिणीने डोळसाच्या दर्शनशक्तीस साहाय्य होते, पण आंधळ्यास् 'तिचा कांही एक उपयोग नाहीं, त्याप्रमाणे जे हस्तकलेत प्रवीण असतील त्यांसच यंत्रकला साधणार आहे; ज्यांचे हात थोटे आहेत त्यांना यंत्रा- पासून म्हणण्यासारखा फायदा होण्याचा संभव नाहीं. आतां येवढें खरें आहे कीं, यंत्रावर काम करणारी बहुतेक मनुष्यें यंत्रासारखींच असतात; नवीन यंत्रे तयार करण्याची किंवा ती बिघडलीं तर दुरुस्त करण्याची कला फार थोड्यांसच साधलेली असते; हा विचार हस्तकलेसही तितकाच लागू आहे. चांगल्या कारागिराने एखादा सुरेख नमुना घालून दिला म्हणजे त्याचे अनुकरण करणारेच शेकडा नव्याण्णव लोक असावयाचे. विशाल कल्पकता