या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंह्ार. ९५ ५ तिसच्या भागांत, मुलांस योग्य तें शिक्षण आईबापांनीं द्यावें, त्यांत अंतर करूं नये, हें सांगितलें आहे. आपल्याकडे पूर्वी शिक्षण देण्याची पद्धति कशी होती, त्यांत कालमानाप्रमाणें फरक कसा पडत गेला, हल्लींची शिक्षणपद्धति कशी आहे, त्यांत कांहीं सुधारणा हव्यात, असे वाटल्यास आईबापांनीं काय करावें, हें सांगितलें आहे. शिक्षक शिक्षण देत असतात, तरी अाईबापांवर शिक्षणाची जबाबदारी किती आहे, हें विस्तृत रीतीनें दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ६ चवथ्या भागांत, मुलांचे विवाह करतांना, कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणें जरूर आहे,याचा विचार केला आहे. तो करतांना, आपल्या सामाजिक चाली कशा आहेत, त्यांत कोणते दोष आहेत, ते कसे दूर करावे, मुलांचा विवाह करण्यांत आईबापांचा कोणता हेतु असावा, इत्यादि विषयांचा विचार केला आहे. ७ एकंदरीत,या निबंधांत संततीच्या हिताकरितां आईबापांनीं काय करावें, हें स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अधिकाराच्या संबंधानें पाहिल्यास, माझा अधिकार फार थोडा आहे. पण आपल्या समाजाची स्थिति सुधारावी, या कळकळीनें प्रोत्साहित होऊन, जे जे विचार सुचले, ते ते या निबंधांत एका -ठिकाणीं प्रथित करण्याचा प्रयत्न केला आहे. तो कसा साधला आहे, हें पाहाणे हे काम सज्जनांचे आहे. ८ डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीच्या सभा- सदांनीं, हा लेख काळजी पूर्वक वाचून जे दोष दाखविले, ते नाहीसे करण्याचा प्रयत्न, माझ्याकडून झाला तेवढा केला आहे. ९ या निबंधांत जें सार वाटेल तें ग्रहण करावें, असार टाकून द्यावें, कमजास्त मला अवश्य कळवावें व ही अल्प सेवा मानून ध्यावी, अशी माझी वाचकांस प्रार्थना आहे.